How to Identify Real Almond: सुकामेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यात असलेली जीवनसत्व आणि ऑक्सिडंट्स शरीराला आतून मजबूत करतात. बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या काजूमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी आणि हृदयाचे रक्षण करण्यास मदत करतात. सुकामेव्याचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि हाडे मजबूत होतात.
बदाम हे एक पौष्टिक आणि ऊर्जा देणारे आहे, ज्याला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. त्यात व्हिटॅमिन ई, निरोगी चरबी प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात. मेंदूच्या आरोग्यासाठी, हृदयाच्या कार्यासाठी, त्वचेसाठी आणि हाडांसाठी बदाम अत्यंत फायदेशीर मानले जातात. बदाम ऊर्जा वाढविण्यास, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासदेखील मदत करतात. याच्या नियमित सेवनाने शरीर निरोगी आणि सक्रिय राहते.
परंतु, हल्ली वाढत्या मागणीमुळे बाजारात बनावट किंवा भेसळयुक्त बदाम मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. नकळत बनावट बदाम खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते म्हणून ते खरेदी करण्यापूर्वी खरे आणि बनावट बदाम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भेसळयुक्त बदाम कसे ओळखाल
रंगाने ओळखा
खरे बदाम सहसा हलक्या तपकिरी रंगाचे असतात. तथापि बनावट किंवा खोटे बदाम बहुतेकदा जास्त चमकदार असतात, यांना अनेकदा पॉलिश केले जाते किंवा रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे त्यांच्यावर कृत्रिम चमक असते.
सुगंधाकडे लक्ष द्या
खऱ्या बदामांना सौम्य, नैसर्गिक, दाणेदार सुगंध असतो. जर बदामांना विचित्र, रासायनिक किंवा
उग्र वास येत असेल तर ते बनावट किंवा खराब असू शकतात. खरेदी करण्यापूर्वी तपासू शकता.
पाण्यात भिजवून पाहा
तुम्ही बदाम पाण्यात भिजवूनदेखील तपासू शकता. काही बदाम ५-६ तास पाण्यात भिजवा, खऱ्या बदामाची साल सहज सोलते आणि बदाम पांढरे आणि पारदर्शक असतात. तथापि, बनावट किंवा प्रक्रिया केलेले बदाम योग्यरित्या सोलले जात नाहीत. कधीकधी बनावट बदाम आतून पिवळेदेखील असतात.
खाऊन तपासा
खऱ्या बदामाचा स्वाद थोडा गोडसर असतो, तर भेसळयुक्त बदाम किंचित कडवट लागू शकते.
या समस्या असलेल्यांनी बदाम खाऊ नये
त्वचेची अॅलर्जी
बदामात अमांडाइन नावाचे प्रोटीन अधिक प्रमाणात असते. हे प्रोटीन काहींच्या शरीराला साजेसे ठरत नाही, उलट याचा गंभीर परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येऊ शकतो. त्वचा तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच बदामाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
अॅसिडिटी
बदामाचे सेवन हे अपचनाचे कारण ठरू शकते. परिणामी सतत करपट ढेकर, अॅसिडिटी, डायरिया असे त्रास जाणवू शकतात. जर तुम्हाला मळमळ किंवा यापोटी बिघडल्याच्या समस्या जाणवत असेल तर बदाम खाणे टाळावे.
श्वसन समस्या
बदामात हाइड्रोसायनिक ॲसिडचे प्रमाण अधिक असते. जर शरीरात या HCN चे प्रमाण वाढले तर श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणूनच बदामाचे सेवन हे प्रमाणात करणे गरजेचे आहे.
