Insulin Plant for Diabetes: आजकाल मधुमेह हा असा एक आजार बनला आहे जो देशातील जवळपास प्रत्येक घरात दिसून येतोय. मधुमेह फक्त वृद्धांनाच नव्हे तर तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. मधुमेहामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे माणसाला इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही देखील मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला हवे असल्यास औषधांव्यतिरिक्त तुम्ही इन्सुलिन प्लांटचा वापर मधुमेह नियंत्रित करण्यासाठी करू शकता. औषधी गुणधर्मांनी युक्त इन्सुलिन वनस्पती मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या उपचारात इन्सुलिनची मदत कशी होते आणि त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती ते देखील जाणून घेऊया.

इन्सुलिन वनस्पती मधुमेह कसे नियंत्रित करते?

इन्सुलिनच्या पानांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असलेले गुणधर्म असल्याचे म्हटलं आहे. त्यात प्रथिने, टेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक अॅसिड, लोह, बी-कॅरोटीन, कोरोसोलिक अॅसिडसह असे अनेक पोषक घटक असतात. या वनस्पतीचे एक पान महिनाभर चघळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. अशा परिस्थितीत या वनस्पतीची पाने चघळल्याने तुमची शुगर लेव्हल बर्‍याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

( हे ही वाचा: मासिक पाळी उशीरा येण्यास ‘ही’ असू शकतात कारणे; जाणून घ्या यावर फायदेशीर उपाय)

इन्सुलिन वनस्पतीचे फायदे

या वनस्पतीच्या पानांमध्ये कॉर्सॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे खोकला, सर्दी, संसर्ग, डोळे, फुफ्फुस, दमा, बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांवरही मात करण्यासाठी या वनस्पतीचा फायदा होतो.

अशा प्रकारे करा इन्सुलिन वनस्पतीचे सेवन

डॉक्टरांच्या मते, या वनस्पतीचे एक पान महिनाभर रोज चघळले पाहिजे. आपण इच्छित असल्यास, आपण पावडर स्वरूपात देखील सेवन करू शकता. त्यासाठी या झाडाची पाने घेऊन वाळवावीत. त्यानंतर ही कोरडी पाने बारीक करून पावडर बनवावी. आता ही पावडर रोज १ चमचा घ्या. असे केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.