Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes Messages In Marathi:मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १४ मे रोजी तारखेनुसार साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा स्वराज्याची सूत्रे १६८१ ते १६८९ या कालावधीत समर्थपणे सांभाळली आणि त्याचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.
स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. मात्र, अंतर्गत फितुरीमुळे ते औरंगजेबाच्या हाती लागले आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांच्या या बलिदानाची आठवण आजही मराठी अस्मितेत खोलवर रुजलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या(तारखेनुसार) जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून अभिवादन करू शकता.

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज, महाराज श्रीमंत,
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सिंहाच्या जबड्यात टाकूनी हात
मोजीन दात अशी ही मराठी जात,
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पाहुनी शौर्य तुझपुढे,
मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी,
माझा शंभू अमर झाला,
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मृत्यूलाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी,
स्वराज्य रक्षक संभाजी झाला
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
हिमालयाएवढे शौर्य असलेल्या महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे, राजा संभाजी!
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन,
असे असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
जो नीतिमत्ता, सत्य आणि देवासमोर नतमस्तक होतो,
संपूर्ण जग त्याचा आदर करतो
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
स्वराज्याचा ज्याला लागला हो ध्यास,
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस,
शत्रुलाही वाटत होती ज्यांची भीती,
असे आमचे संभाजी राजे ‘छत्रपती’
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा
वंदन करितो बलिदानाला जय शंभूराया
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
रुद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, त्या सह्याद्रीला विचारा
माझा शंभूराजा कसा होता!
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)