नियमितपणे चॉकलेट खाण्यामुळे आकलन करण्याची क्षमता आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होते. तसेच वयस्क व्यक्तींची कमी होत चाललेली स्मृती यामुळे टिकून राहण्यास मदत होते, असे नव्या अभ्यासात आढळून आले आहे.

इटलीच्या ला अ‍ॅक्विला विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. कोको बीन हा फ्लॅनोल्सचा समृद्ध स्रोत आहे. हा एक नैसर्गिक संयुग असलेला आणि न्यूरोप्रोटेक्टिव्हचा प्रभाव आहे.

संशोधकांनी कोको फ्लॅनोल्सचा वेगवेगळय़ा पातळय़ांवर अभ्यास केला. तसेच कोकाचा परिणाम या वेळी अभ्यासण्यात आला. यामध्ये कोको आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचे दिसून आले.

कोको फ्लॅनोल्स घेतल्यानंतर स्मृती शक्तीमध्ये वाढ होत असल्याचे आणि दृश्य प्रतिमांमध्ये सुधारणा  होत असल्याचे सहभागींनी सांगितले.

महिलांनी कोको घेतल्यानंतर पूर्ण झोप घेतल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. जे रात्रपाळीमध्ये काम करतात अथवा ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यामध्ये याचा चांगला परिणाम दिसून येतो. जे रोज कोको फ्लॅनोल्स घेतात त्यांच्यामध्ये संयुक्तरीत्या अधिक परिणाम दिसून येतो. लक्ष देणे, कामाची गती वाढणे, काम करण्याची क्षमता आणि बोलण्याचा शाब्दिक ओघ यामुळे प्रभावित होतो.

नियमितपणे कोको आणि चॉकलेट घेण्यामुळे फायदेशीर परिणाम दिसून येतात, असे संशोधकांनी सांगितले.