Constipation causes: तुम्हाला काही दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे का आणि वारंवार प्रयत्न करूनही शौचास होत नाहीये का? या समस्येची कारणे काय आहेत, यापासून आराम कसा मिळवावा आणि कोणत्या कर्करोगांचे हे कारण असू शकते, हे NIH आणि NHS कडून जाणून घेऊया…

बद्धकोष्ठता म्हणजे शौचाच्या सवयींमध्ये होणारा बदल, जसे की शौचास कमी वेळा होणे किंवा शौचास त्रास होणे.
एनएचएसच्या मते, बद्धकोष्ठतेच्या कारणांमध्ये पुरेसे फायबर आणि पाणी न घेणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि शौचालयाला जाण्याची इच्छा असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे या बाबींचा समावेश होतो. गेल्या आठवड्यात तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे, शौच नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात होणे, शौच कोरडे, कडक किंवा गाठीदार असणे या लक्षणांचा बद्धकोष्ठतेमध्ये समावेश होतो.

सकाळी उठल्यावर शौचास साफ होत नसेल, तर बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात; पण जेव्हा हे दोन किंवा अधिक दिवस चालू राहते, तेव्हा प्रश्न निर्माण होतात: शरीरात मल कुठे साचून राहतो आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? काही लोकांचा असा विश्वास आहे की, मल आतड्यांमध्ये साचतो आणि तो सडू लागतो, तर काही जण याला एक सामान्य समस्या मानून काही दिवस त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला वारंवार असे होत असेल, तर शौचास किती वेळ लागतो, बद्धकोष्ठतेचे निदान कसे केले जाते आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे कारण केव्हा बनले पाहिजे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला, या लेखात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूया.

बद्धकोष्ठतेची समस्या काय?

बद्धकोष्ठता म्हणजे शौचाच्या सवयींमध्ये होणारा बदल, जसे की शौचास कमी वेळा होणे किंवा शौचास त्रास होणे. ही एक सामान्य समस्या असून, ती सर्व वयोगटांतील लोकांना होऊ शकते. साधारणपणे, ही समस्या १-२ दिवस टिकते आणि काही प्रकरणांमध्ये ती आणखी काही दिवस टिकू शकते. तथापि, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल करूनही बद्धकोष्ठता कायम राहिल्यास, ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती असल्याची चिंता निर्माण होते. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही सवयी आणि औषधोपचाराने त्यावर उपचार करता येतो.

बद्धकोष्ठतेची कारणे काय?

बद्धकोष्ठता ही केवळ एक किंवा दोन कारणांमुळे नव्हे, तर अनेक कारणांमुळे उद्भवणारी समस्या आहे. तथापि, यामागील सर्वांत मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे आपली स्वतःची जीवनशैली, जी या समस्येस कारणीभूत ठरते. एनएचएस (राष्ट्रीय आरोग्य सेवा) नुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये बद्धकोष्ठता निर्माण करणाऱ्या काही गोष्टींमध्ये खालील बाबींचा समावेश होतो;

  • पुरेसे फायबर न मिळणे (फायबर फळे, भाज्या आणि धान्यांमध्ये आढळते)
  • पुरेसे पाणी न पिणे
  • पुरेशा शारीरिक हालचालीचा अभाव किंवा दीर्घकाळ बसून राहणे किंवा झोपून राहणे
  • कमी सक्रिय राहणे आणि व्यायाम न करणे
  • वारंवार शौचालयाला जाण्याची इच्छा दुर्लक्षित करणे
  • चांगल्या खाण्याच्या सवयी न पाळणे
  • औषधाचे दुष्परिणाम
  • ताण, चिंता किंवा नैराश्य
  • याव्यतिरिक्त, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर बद्धकोष्ठता सामान्यपणे आढळते. तुमचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास, ही समस्या सामान्यपणे आढळू शकते.

बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे केवळ शौचास न होणे नव्हे

जर तुम्हाला काही तासांपासून शौचास झाले नसेल, तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला बद्धकोष्ठता आहे. अशी अनेक इतर लक्षणे आहेत, जी दर्शवतात की, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

गेल्या आठवड्यात तुम्हाला किमान तीन वेळा शौचास झाले नाही किंवा तुम्हाला नेहमीपेक्षा कमी वेळा शौचास होत आहे. मल नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात बाहेर पडतो आणि तो कोरडा, कडक किंवा गाठींच्या स्वरूपात असतो. शौचास जाताना तुम्हाला जोर लावावा लागतो किंवा वेदना होतात. तुमचे आतडे पूर्णपणे रिकामे झाले नाही, असे तुम्हाला वाटते.

जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि जीवनशैलीत काही बदल करणे चांगले राहील.

पोटात मल सडू लागतो का?

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवस शौचास होत नसेल किंवा बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याच्या आतड्यातील मल सडू लागतो आणि ती व्यक्ती गंभीर आजारांना बळी पडू शकते. पण, वैद्यकीय शास्त्र याबद्दल एक वेगळेच सत्य सांगते. एनएचएसच्या (NHS) मते, जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवस शौचास होत नसेल, तर त्याच्या आतड्यातील मल हळूहळू सुकतो आणि एका टप्प्यावर तो कठीण होतो, ज्यामुळे नंतर शौचास जाण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

कोणत्या सवयींमुळे बद्धकोष्ठता बरी होऊ शकते?

एनएचएसच्या मते, काही बदल केल्याने बद्धकोष्ठतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी, चांगला, संतुलित आहार घ्या आणि सॉर्बिटॉल नावाचा पदार्थ असलेली फळे खा, जसे की…

  • सफरचंद, द्राक्षे, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरी.
  • वेळोवेळी पाणी पीत राहा आणि इतर पेयेही घ्या
  • दारूपासून दूर राहा
  • आपल्या आहारात फायबरचा समावेश करा.
  • त्याव्यतिरिक्त, ताजेतवाने होण्यासाठी रोज शौचालयात जा. जेव्हा तुम्हाला लघवीची इच्छा होईल, तेव्हा ती जास्त वेळ रोखून धरू नका.
  • रोज चालण्याची आणि धावण्याची सवय लावा.

जर बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ टिकून राहिली आणि आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेली औषधे घ्या.

कर्करोगदेखील बद्धकोष्ठतेचे कारण असण्याची शक्यता

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही प्रकरणांमध्ये, बद्धकोष्ठतेचा संबंध कर्करोगाशी असतो. एनआयएच (NIH) नुसार, काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांमध्ये बद्धकोष्ठता हे एक लक्षण असू शकते. हे कर्करोग पोटातील अवयवांवर दाब टाकतात, आतड्यांमधून मल जाण्याचा मार्ग अडवतात किंवा आतड्यांशी जोडलेल्या मणक्यातील नसांवर परिणाम करतात. बद्धकोष्ठता निर्माण करू शकणाऱ्या काही कर्करोगांमध्ये मोठ्या आतड्याचा कर्करोग (कोलन कॅन्सर), गुदद्वाराचा कर्करोग (रेक्टल कॅन्सर), अंडाशयाचा कर्करोग आणि मेंदूच्या गाठी (ब्रेन ट्युमर) यांचा समावेश होतो.