Bottles Cleaning Hacks : ऑफिस, जिम तसेच घरातही पाणी पिण्यासाठी अनेकजण पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतो. शाळेतील मुलेही बाटल्यांमधून पाणी पितात. या बाटल्या स्टील, प्लास्टिक किंवा काचेच्या असतात, ज्याचा वापर प्रत्येक घरात होतो. पाणी स्वच्छ ठेवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच बाटलीची नियमित स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे.दररोज वापरातील पाण्याची बाटली किती दिवसांनी आणि कशी स्वच्छ करावी जाणून घेऊ…
बरेच लोक त्यांच्या पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करण्याकडे तितके लक्ष देत नाही.पण ही सवय हानिकारक ठरू शकते. जास्त काळ बाटली न स्वच्छ केल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे पाण्याची चव देखील खराब होऊ शकते आणि तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाण्याची बाटली नियमितपणे स्वच्छ करणे चांगले. जर हे शक्य नसेल तर ती दर २-३ दिवसांनी धुवावी.
कशी स्वच्छ कराल?
बाटलीचा बाहेरचा भाग स्पंज आणि गरम पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड मिसळून स्वच्छ करा.आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता. हात बाटलीच्या आत पोहोचू शकत नसल्यामुळे बाटली स्वच्छ करण्याचा ब्रश मिळतो तो वापरा. यामुळे बाटली आतून स्वच्छ करणे सोपे होईल.
बाटलीचा वरचा भाग, स्ट्रॉ आणि कॉर्नर पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे . तुम्ही हे ब्रशने घासू शकता. बाटल्या स्वच्छ केल्यानंतर त्या पूर्णपणे उन्हात वाळवू द्या. सिलिकॉन भागांखाली राहिलेल्या ओलाव्यामुळे बुरशी वाढू शकते.
बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
सिंकजवळ बाटल्या स्वच्छ करण्यासाठी एक ब्रश ठेवा जेणेकरून तुम्हाला तो वारंवार शोधण्याची गरज पडणार नाही.जर तुम्ही खूप प्रवास करत असाल तर तुम्ही एक लहान, पोर्टेबल ब्रश वापरू शकता. बाटल्या स्वच्छ करण्यासाठी मार्केटमध्ये गोळ्या देखील उपलब्ध आहेत, विशेषतः जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा याचा उपयोग करु शकतात.
दुर्गंधी दूर करण्यासाठी टिप्स
जर बाटलीला आतून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ती दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू वापरू शकता. दोन्हीमध्ये नैसर्गिक स्वच्छता गुणधर्म आहेत जे स्वच्छ करू शकतात आणि वास दूर करू शकतात. हे करण्यासाठी, बाटलीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. आता कोमट पाणी घाला आणि चांगले हलवा. १५-२० मिनिटांनी ते धुवा. यामुळे दुर्गंधी सहजपणे दूर करता येईल.
