How to Dry Clean At Home: कपडे ड्राय क्लीनिंगसाठी देणे किती खर्चिक असते हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. ड्राय क्लीन ही कपडे धुण्याची एक महागडी प्रक्रिया आहे. त्यामुळे कपडे कितीही अस्वच्छ असले तरी ते ड्राय क्लीनला देताना दहा वेळा विचार करावा लागतो. काही वेळा ड्राय क्लीनसाठी लाँड्रीत दिलेले कपडे वेळेवर मिळत नाहीत. यात लग्न आणि सणासुदीच्या काळात तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागते.

अशावेळी लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, घरी ड्राय क्लीनिंग करण्याचा काही उपाय आहे का? तुम्हीही याचे उत्तर शोधत असाल तर खालील माहिती तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला महागडे आणि नाजूक कपडे घरीच ड्राय क्लीन करण्याचा एक उत्तम उपाय सांगणार आहोत. लाँड्रीत केल्या जाणाऱ्या ड्राय क्लीनिंगच्या प्रक्रियेपेक्षा घरच्या घरी केल्या जाणाऱ्या ड्राय क्लीनिंगची प्रक्रिया थोडी वेगळी असली, तरी कपड्याची चमक तशीच राहील. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचतील.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

१) ड्राय क्लीनिंग म्हणजे काय?

सामान्यत: कपडे स्वच्छ करण्यासाठी पाणी आणि डिटर्जंटचा वापर केला जातो. पण, ड्राय क्लीनिंगमध्ये पाण्याचा वापर न करता कपडे स्वच्छ केले जातात. यामध्ये पाणी आणि डिटर्जंटऐवजी कार्बनिक सॉल्व्हेंट्सने कपडे स्वच्छ केले जातात. ड्राय क्लीनिंगचा वापर सामान्यतः रेशीम, लोकर आणि मखमलीसारखे नाजूक कापड स्वच्छ करण्यासाठी केला जातो.

२) ड्राय क्लीनिंग करण्यापूर्वी कपड्यांचे लेबल तपासा

जर तुम्हाला घरीच कपडे ड्राय क्लीन करायचे असतील, तर आधी कपड्यांवरील इन्स्ट्रक्शन लेबल काळजीपूर्वक वाचा आणि त्यावरील नियम फॉलो करा. यासोबतच फॅब्रिकनुसार डिटर्जंट निवडा. रंगीत कपडे वेगळे ठेवा. तसेच गरम पाणी वापरू नका.

३) ड्राय क्लीनसाठी तयार करा सॉल्यूशन

हाताने ड्राय क्लीनिंग करण्यासाठी तुम्ही लिक्विड डिटर्जंट थंड पाण्यात मिसळा आणि काही वेळ असेच राहू द्या. जर तुम्ही सिल्कचे कपडे धूत असाल, तर त्यासाठी खास डिझाईन केलेले डिटर्जंट वापरणे हा उत्तम पर्याय आहे.

४) कपडे घरीच ड्राय क्लीनिंग कसे करावे

कपडे सोल्यूशनमध्ये बुडवा आणि ३० मिनिटे हलक्या हाताने घासून घ्या. कोणत्याही प्रकारचे ब्रश वापरणे टाळा. यावेळी कपडे जास्त वेळ पाण्यात बुडवून ठेऊ नका, त्यामुळे कपडे खराब होण्याचा धोका आहे.

५) धुतल्यानंतर असे करा कोरडे

कपडे हळूवारपणे पिळून घ्या आणि शक्य तितके पाणी काढून टाका. यानंतर ते कोरडे होण्यासाठी सपाट पृष्ठभागावर हवेत ठेवा. कपडे हँगरवर लटकवून कडक उन्हात वाळवणे टाळा.

६) मशीनमध्ये ड्राय क्लीनिंग करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

ड्राय क्लीनिंग केलेले कपडे लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवा. यावेळी पांढऱ्या कपड्यांसोबत रंगीत कपडे ठेवू नका. मशीनमध्ये थंड पाण्यात लिक्विड डिटर्जंट मिसळा. मशीनमध्ये लॉन्ड्री बॅग टाका आणि सर्वात कमी स्पीडमध्ये १ -२ सायकल पूर्ण होईपर्यंत सोडा. कपडे सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका, ते सुकविण्यासाठी सपाट जागेवर हवेत ठेवा.

Story img Loader