हवामान बदलामुळे लोकांची झोप कमी होत आहेत, जाणून घ्या सविस्तर

अलीकडे २० मे रोजी प्रकाशित झालेल्या वन अर्थ जर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या संशोधनानुसार, वातावरणातील वाढत्या तापमानाचा जगभरातील व्यक्तींच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

sleep

हवामानामध्ये झालेल्या तीव्र बदलांचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. हवामानातील तीव्र घटनांचा व्यापक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक आरोग्य परिणामांवर कसा परिणाम होतो याचं विश्लेषण अनेक संशोधनात केलं आहे. वातावरणातील बदलाचा मानवी दिनचर्येवर मोठा प्रभाव पडतो, ज्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या वर्तणूक, मानसिक आणि शारीरिक परिणामांचा समावेश होतो.

अलीकडे २० मे रोजी प्रकाशित झालेल्या वन अर्थ जर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या संशोधनानुसार, वातावरणातील वाढत्या तापमानाचा जगभरातील व्यक्तींच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

हवामान बदलामुळे लोकांच्या झोपेवर कसा परिणाम होतो?
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हवामानातील बदलामुळे लोकांची झोप कमी होत आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, २०९९ पर्यंत कमी तापमानामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रति वर्ष ५० ते ५८ तासांची झोप कमी होऊ शकते. संशोधकांना असेही आढळून आले की तापमानामुळे झोप कमी होण्याचा परिणाम कमी उत्पन्न असलेल्या देशांतील रहिवाशांसाठी तसंच वृद्ध, प्रौढ आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

वाढत्या उष्णतेमुळे मृत्यूच्या घटना आणि हॉस्पिटलायझेशन वाढत आहेत. मानवी कार्यक्षमतेत बिघड होतो ही वस्तुस्थिती फार पूर्वीपासून ज्ञात आहे. पण, प्रभावांच्या बायोलॉजिकल आणि वर्तवणूकीत होणारे परिणाम सखोलपणे स्पष्ट झाल्या नाहीत. युनायटेड स्टेट्समधील अलीकडील सेल्फ रिपोर्टमधल्या महितीनुसार उष्ण हवामानाच्या काळात माणसाच्या झोपेची गुणवत्ता कमी होते, असं अभ्यासात म्हटलं आहे. पण जागतिक हवामानात राहणाऱ्या लोकांच्या झोपेवर तापमानातील चढ-उतारांचा कसा परिणाम होऊ शकतो हे अद्याप अस्पष्ट आहे, असं संसोधकांनी अभ्यासात नमूद केलं आहे.

संशोधकांनी अ‍ॅक्सेलेरोमीटर-आधारित स्लीप-ट्रॅकिंग रिस्टबँड्समधून मिळवलेला निनावी ग्लोबल स्लीप डेटा वापरला आहे. एक्सेलेरोमीटर हे एक साधन आहे जे शरीरातील कंपने आणि हालचाल मोजण्यासाठी वापरले जाते. ग्लोबल स्लीप डेटामध्ये अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांमध्ये पसरलेल्या ६८ देशांमधील ४७,००० हून अधिक प्रौढांच्या ७ दशलक्ष रात्रीची झोपेच्या नोंदींचा समावेश आहे.

आणखी वाचा : हवामान बदलामुळे लोकांची झोप कमी होत आहेत, जाणून घ्या सविस्तर

अत्यंत उबदार रात्री काय होतं?
अभ्यासानुसार, अत्यंत उबदार रात्री झोप सरासरी १४ मिनिटांपेक्षा कमी होते. उबदार रात्री तापमान ३० अंश सेल्सिअस किंवा ८६ अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त असतात. तापमान वाढले की सात तासांपेक्षा कमी झोप लागण्याची शक्यताही वाढते.

याआधी स्लीप लॅबमध्ये केलेल्या संसोधनात असेही आढळून आले की, जेव्हा खोलीचे तापमान खूप गरम किंवा खूप थंड असते तेव्हा मनुष्य आणि प्राणी दोघांचीही झोप खराब होते. पण, हे नवीन संशोधन लोक वास्तविक जगात कसे वागतात यावर मर्यादित होते. संशोधकांना आढळले की लोक त्यांच्या झोप अगदी आरामदायी व्हावी यासाठी वातावरणाचे तापमान बदलतात.

अभ्यासकांच्या मते, सामान्य राहणीमानानुसार, लोक गरम परिस्थितीपेक्षा बाहेरील थंड तापमानाशी उत्तम जुळवून घेतात. तसंच, विकसनशील देशांतील लोक या बदलांमुळे अधिक प्रभावित झालेले दिसतात.

विकसित देशांमध्ये एअर कंडिशनिंगचा होत असलेला प्रसार यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण शास्त्रज्ञ निश्चितपणे कारणे ओळखू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे विषयांमधील एअर कंडिशनिंगबाबत डेटा उपलब्ध नव्हता. अभ्यासकांनी नमूद केले की, झोपेच्या नुकसानावर तापमानवाढीच्या तापमानाचा परिणाम जागतिक स्तरावर असमान असल्याचा दमदार पुरावा त्यांनी उघड केला आहे. त्यामुळे नवीन संशोधनात असुरक्षित लोकसंख्येचा विचार केला पाहिजे, विशेषत: जगातील सर्वात उष्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या गरीब प्रदेशांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा यात विचार करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Climate change is causing people to sleep less says study prp

Next Story
‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी