scorecardresearch

Premium

Hair Care: दाट आणि लांब केस हवे आहेत? मग करा ‘या’ पाच तेलांचा वापर, जाणून घ्या

आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेतली जाते.

5 best oil useful for hair growth
लांब आणि दाट केसांसाठी केसांना तेल लावले जाते. (Image Credit- Freepik)

आपण सुंदर दिसण्यामध्ये आपल्या केसांचा मोठा वाटा असतो. केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स वापरले जातात. बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत असतो, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. लांब आणि दाट केसांसाठी केसांना तेल लावले जाते. तेलामुळे केसांना पोषक तत्वांचा पुरवठा होतो.आज आपण तेलांचे असे काही प्रकार पाहणार आहोत जे केसांना लावल्यामुळे केस अधिक दाट आणि लांब होण्यास फायदा होतो. आठवड्यातून एक ते दोन वेळा या तेल लावून केसांना मॉलिश केले जाऊ शकते. तर जाणून घेऊयात केसांसाठी फायदेशीर असलेले तेलांचे प्रकार.

भृंगराज तेल

भृंगराज तेल हे आयुर्वेदिक तेल आहे. आयुर्वेदिक तेलांमध्ये भृंगराज तेलाचा समावेश होतो. हे तेल सर्वात चांगले तेल म्हणून ओळखले जाते. कारण हे तेल केसांना लावले असता केसांच्या मुळांना पोषक तत्वांचा पुरवठा होतो. भृंगराज तेलामध्ये असणाऱ्या घटकांमुळे केसांना अँटी मायक्रोबिअल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात.

our digestive system, food type and problem of Abdominal pain
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोटदुखी (उदरशूल)
natural beauty of mandoshi village
अवांतर : मंदोशीची हिरवी वाट!
Curly_Hair_Care_Tips
कुरळ्या केसांची सुंदरता वाढवेल ‘हे’ तेल; कसा करावा वापर? जाणून घ्या
Makhana Health Benefits
१०० ग्रॅम मखाण्यामध्ये किती पौष्टिकता असते? दररोज मुठभर खाणे चांगले? आहारतज्ज्ञ सांगतात की…

हेही वाचा : Hair Care: लांब, काळे आणि दाट केस हवे आहेत? ‘या’ प्रकारे करा मेथीचा वापर; जाणून घ्या

कांद्याचे तेल

कांद्याचा रस केसांसाठी फार चांगला असतो. यामुळे केसांना अनेक फायदे मिळतात. तुम्ही घरच्या घरीसुद्धा कांद्याचे तेल तयार करू शकता. कांद्याचे तेल तयार करण्यासाठी कांद्याचे लहान लहान तुकडे करावेत. त्यानंतर हे तुकडे नारळाच्या तेलामध्ये मिसळून ते शिजवावेत. चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर हे तेल गाळून वेगळे करा. या प्रकारे तुम्ही कांद्याचे तेल तयार करून केसांना लावू शकता.

नारळाचे तेल

खोबरेल तेलाचा सर्वात चांगला परिणाम कोरड्या केसांवर दिसून येतो. हे तेल केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या कमी करते आणि केसांच्या वाढीस देखील मदत करते. केस धुण्याच्या एक तास आधी खोबरेल तेल थोडेसे गरम करून केसांना लावता येते.

बदामाचे तेल

बदामाचे तेल देखील केसांसाठी चांगले असते. बदामाचे तेल केसांना लावले असता केसांना पोषण मिळते. तुम्ही तुमच्य केसांना बदामाचे तेल थोडेसे गरम करून देखील लावू शकता. बदामाच्या तेलामुळे केसांचे तुटणे कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा : Beauty Tips: त्वचेवर काळे डाग आहेत? टेन्शन घेऊ नका, फक्त दुधाचा असा करा वापर…

कॅस्टर ऑइल

केसांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमध्ये एरंडेल तेलाचं देखील समावेश होतो. एरंडेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई, खनिजे आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. हे तेल केसांना लावले असता केसांचे योग्य प्रमाणात पोषण होते. त्यामुळे केस अधिक दाट आणि लांब होण्यास मदत होते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coconut alomond onion castor bhrungraj oil useful for hair growth check all benifits tmb 01

First published on: 25-09-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×