Coconut could help reduce urinary infections | Loksatta

युरीन इन्फेक्शन कमी करण्यात मदत करू शकतो ‘हा’ फळ, इतरही समस्यांमध्ये लाभदायी

नारळाचा एक तुकडा दररोज खालल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली होऊ शकते. नारळातील संयुगे युरीन इन्फेक्शन कमी करण्यात मदत करू शकता.

युरीन इन्फेक्शन कमी करण्यात मदत करू शकतो ‘हा’ फळ, इतरही समस्यांमध्ये लाभदायी
(Pic Credit-Pixabay)

नारळ हे शरीरासाठी आरोग्यदायी आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. त्वचा, केस आणि पोटाचे विकार दूर करण्यात नारळ मदत करू शकते. नारळात भरपूर प्रमाणात प्रथिने, विटामिन आणि खनिजे आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नारळाचा एक तुकडा दररोज खालल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली होऊ शकते. नारळातील संयुगे युरीन इन्फेक्शन कमी करण्यात मदत करू शकतात.

युरीन इन्फेक्शन असताना नारळाचे पाणी पिल्याने विषारी पदार्थ शरिरातून बाहेर पडतात. नारळ युरीन इन्फेक्शन व्यतिरिक्त अनेक आजारांना बरे करण्यात मदत करू शकते. नारळाचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया.

(कंपन्यांना फ्रेशरकडून ‘या’ कौशल्यांची अपेक्षा, नोकरी मिळवण्यासाठी आताच जाणून घ्या)

१) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते

नारळात कार्बचे प्रमाण कमी असते आणि फायबर व फॅटचे प्रमाण अधिक असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात फायदेशीर ठरू शकते. तसेच नारळात अँटिऑक्सिडेंट आणि अँटिइन्फ्लेमेटोरी गुण असतात जे रक्तातील साखरचे प्रमाण कमी करण्यात मदत करतात.

२) पोटाच्या विकारांवर फायदेशीर

ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होते त्यांनी नियमित नारळाचे सेवन केले पाहिजे. नारळात फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, जे पोटाशी संबंधित विकारांमध्ये आराम देते.

(शौचाशी संबंधित ‘या’ समस्या दूर होण्यास मदत करते तूप, जाणून घ्या इतर फायदे)

३) हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते

नारळाचे तेल शरीरासाठी हानिकारक असलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते. यामुळे हृदयासंबंधी विकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. नारळ तेलाने बनलेले अन्न खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढणे कमी होऊ शकते.

४) युरीन इन्फेक्शन

लघवी होताना जळजळ आणि खाज कमी करण्यात नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. युरिन इन्फेक्शनदरम्यान अधिकाधिक नारळाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. नारळाचे पाणी किंडनीच्या समस्येला दूर करण्यात मदत करू शकते. नारळ डिटॉक्सचे काम करते.

५) वजन कमी करण्यात फायदेशीर

नारळाचे सेवन केल्याने बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. जे वजन कमी करण्यात मदत करू शकते. नारळामध्ये चरबी घटवणारे संयुगे असतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Uric Acid: ‘या’ ४ आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही युरिक अॅसिड आणि सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता; जाणून घ्या तज्ज्ञांकडून

संबंधित बातम्या

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय
‘या’ ५ पदार्थांच्या मदतीने पूर्ण करा शरीरातील झिंकची कमतरता
स्मार्टफोनचा स्फोट होण्यापासून टाळायचा असेल तर ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी
रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरूनही घेतला समाचार
VIDEO: “…म्हणून ते ‘हे राम’ आणि ‘जय सिया राम’ म्हणत नाहीत”, राहुल गांधींचं भाजपा आणि आरएसएसवर टीकास्र
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा