Coconut peel benefits: नारळाचा फायदा अनेक गोष्टींसाठी होतो. रोजच्या जेवणात गृहिणींकडून वापरला जाणारा हा नारळ आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, परंतु नारळाच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात.

नारळाच्या सालीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. अनेकदा भांडी स्वच्छ करण्यासाठी, एखादा डाग काढण्यासाठी, घरात धूप करण्यासाठी, होमहवनासाठी नारळाच्या या सालीचा वापर होतो. अशा लहान-सहान गोष्टींमध्ये आपण नारळाच्या सालीचा अनेक प्रकारे वापर करतो. परंतु, आपल्या आरोग्यासाठीदेखील या सालीचे भरपूर महत्त्व आहे.

Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
heart friendly snacks list
Heart-Friendly Snacks : ओट्स ते डार्क चॉकलेट… फक्त ‘या’ पाच पदार्थांचा आहारात समावेश करा; निरोगी राहील हृदय
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
smokers and non addicts are also becoming victims of lung cancer
मुंबई : वाढत्या वायू प्रदुषणाचा धोका; धूम्रपान न करणारेही फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या विळख्यात…वाचा कसे ते…
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
EY Pune employee death
अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?
superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?

नारळाच्या सालीचे सहा फायदे खालीलप्रमाणे: (Coconut peel benefits)

पाचक आरोग्य (Digestive Health)

नारळाच्या सालीमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांसंबंधी हालचालींचे नियमन करण्यास, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आणि निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियांना सपोर्ट करण्यास मदत करते.

नैसर्गिक सौंदर्य उपचार (Natural Beauty Treatment)

नारळाच्या सालीमधील अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिडस् तुमच्या त्वचेला पोषण देतात आणि मॉइश्चरायझ करू शकतात. तसंच यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी व्हायला मदत होते. ग्लोईंग स्किनसाठी फेस मास्क किंवा स्क्रब म्हणून वापरा.

हेही वाचा… फ्रिजमध्ये हे १० पदार्थ चुकूनही ठेवू नका! आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

इम्यून सिस्टमला सपोर्ट करते (Supports Immune System)

नारळाच्या सालीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी संयुगे (immunomodulatory compounds) असतात, जे रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करण्यास, संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.

तणाव आणि चिंता कमी करते (Reduces Anxiety and Stress)

नारळाच्या सालीच्या सुगंधाचा मन आणि शरीरावर शांत प्रभाव पडतो, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. अरोमाथेरपीमध्ये (aromatherapy) याचा वापर करून पाहा.

हेही वाचा… तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

पर्यावरणपूरक (Environmentally Friendly)

नारळाच्या सालीचा वापर नैसर्गिक कीटकनाशक, खत आणि जैव इंधन म्हणून केला जाऊ शकतो, ज्यामुळे ते रासायनिक आधारित उत्पादनांसाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय बनते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे (Lowering Cholesterol Level)

नारळाच्या सालीमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, हृदयाच्या आरोग्यास समर्थन देण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

हेही वाचा… झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. त्यामुळे हा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा पर्याय मानला जाऊ नये.