Right time and quantity to drink coconut water: नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्रत्येक आजारी माणसाला आवर्जून नारळाचे पाणी प्यायला देतात. नारळाच्या पाण्याने दिवसाची सुरुवात केल्याने पोट आणि शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय लठ्ठपणा, अपचन आणि डिहायड्रेशनसारख्या समस्याही दूर राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की, नारळ पाण्याचे जास्त सेवन केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत नारळपाणी सेवन करण्यापूर्वी माणसाने हे जाणून घेतले पाहिजे की, कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात नारळाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया नारळपाणी पिण्याची योग्य वेळ आणि ते किती प्रमाणात प्यावे. तसंच जास्त आणि अयोग्य वेळी नारळपाणी प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट यांच्या माहितीनुसार, वर्कआऊट दरम्यान किंवा वर्कआऊट नंतर नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीराला फायदा होतो. नारळाच्या पाण्यात भरपूर खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात जे तुमची ऊर्जा पातळी त्वरित वाढवण्यास मदत करतात. व्यायाम करताना नारळ पाणी प्यायल्यास थकवा आणि डिहायड्रेशनची समस्या कमी होण्यास मदत होते. कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंकसाठी नारळ पाणी हा नैसर्गिक पर्याय असू शकतो. इतर अनेक स्पोर्ट्स ड्रिंक्सपेक्षा त्यात जास्त पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स, कमी सोडियम आणि कमी कार्बोहायड्रेट असतात.

( हे ही वाचा: वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक करण्याच्या ‘या’ पद्धतींचे पालन करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

नारळाच्या पाण्यात एन्झाईम्स, अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात.यामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक मजबूत प्रतिकारशक्ती राखण्यास मदत करतात. विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. असे असूनही, काही लोकांसाठी, नारळ पाण्याचे सेवन नुकसान पोहोचवू शकते.

नारळ पाणी पिण्याचे तोटे

१) लूज-मोशन

जर कोणाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी जास्त प्रमाणात नारळ पाणी पिऊ नये. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि तुम्हाला लूज मोशन होऊ शकते. त्यामुळे पोटाच्या संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळाच्या पाण्याचे सेवन करणे टाळावे.

( हे ही वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)

२) सर्दी

हवामान बदलल्याने बरेच लोक लवकर आजारी पडतात. अशा लोकांना खूप लवकर सर्दी होते. जर तुम्हालाही थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सर्दी, खोकला यासारख्या समस्या उद्भवू लागल्या तर नारळ पाण्याचे जास्त सेवन करणे टाळा. वास्तविक, नारळाच्या पाण्याचा प्रभाव थंड होण्याचा असतो, ज्यामुळे तुम्हाला थंडी जाणवू शकते आणि त्यामुळे खोकला, सर्दी होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे अशा लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

३) उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबासाठी औषध घेत असलेल्यांनी नारळपाणी जास्त पिऊ नये. नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. अशा स्थितीत आवश्यकतेपेक्षा जास्त नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी नारळपाणी पिणे सहसा टाळावे.

( हे ही वाचा: चांगल्या आरोग्यासाठी पूर्णपणे कुकिंग ऑईल खाणे सोडू नका; जाणून घ्या कोणते तेल आहे चांगले)

४) शस्त्रक्रिया

जर तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळाच्या पाण्याचे सेवन करू नका. शस्त्रक्रियेनंतर लगेच नारळाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी नारळाचे पाणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पिऊ नये.

नारळ पाणी पिण्याची उत्तम वेळ कोणती?

सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. नारळ पाणी हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि व्यायामापूर्वी ऊर्जा वाढवते. वर्कआउट करताना याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामध्ये कॅलरी कमी असतात तसंच नारळाचे पाणी पचायला देखील सोपे असते. नारळाचे पाणी तीव्र व्यायामादरम्यान गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यास मदत करते. नारळाचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होण्यास मदत होते. याशिवाय एक ग्लास नारळ पाणी हे हॅंगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे.

( हे ही वाचा: लॅपटॉप आणि मोबाईलचा अतिवापर डोळ्यांना त्रास देऊ शकतो; अशाप्रकारे घ्या डोळ्यांची काळजी)

एका दिवसात किती नारळ पाणी प्यावे?

शरीराला दररोज २६०० एमजी ३४०० एमजी पोटॅशियम आवश्यक असते. एका नारळात सुमारे ६०० मिलीग्राम पोटॅशियम असते. पण नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये हायपरक्लेमिया (पोटॅशियम टॉक्सिसिटी) होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, दररोज २ ते ३ नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut water harmful to health know how much to drink and at what time gps
First published on: 06-07-2022 at 14:11 IST