Coffee Benefits: कॉफी हे पेय चहा इतकंच अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल, झोप घालवायची असेल, तर कॉफीला उत्तम पर्याय मानले जाते. परंतु, कॉफी फक्त झोप कमी करणारे पेय नसून, कॉफीचा तुमच्या आहारात योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे कॉफीचा समावेश केल्यास सर्वांगीण आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. इतकेच नाही, तर कॉफीमधील पोषक तत्त्वे काही गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासदेखील मदत करू शकतात. चला, कॉफी पिण्याचे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

कॉफी पिण्याचे चमत्कारी फायदे

हृदयासाठी फायदेशीर

कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. कॉफीच्या सेवनाने गंभीर आणि जीवघेण्या हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. तुमच्या माहितीसाठी, पार्किन्सन्स आणि अल्झायमर रोगांचा धोका कमी करण्यासाठीही कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याव्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचा मूड सुधारायचा असेल, तर तुम्ही कॉफी पिण्यास सुरुवात करू शकता.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॉफीचा तुमच्या केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कॉफी प्रभावी ठरू शकते. नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठी तुमच्या आहार योजनेत कॉफीचा समावेश केला जाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त तुमची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरू शकते.

त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी

कॉफीमध्ये असणाऱ्या बी 3 जीवनसत्त्वामुळे कॉफी त्वचेच्या कर्करोगापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका संशोधनामध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे कॉफी पीत असल्याने २५ टक्के महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका टळला आहे. ज्या महिला दिवसातून तीन कप कॉफी पितात, त्यांना त्वचेच्या कर्करोगाची भीती राहात नाही, असा दावा करण्यात आला आहे.

सूर्यकिरणांपासून करते बचाव

सूर्यकिरणांच्या थेट प्रभावामुळे आपली त्वचा आणि विशेषत: चेहरा खराब होतो. पण, कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्स त्याच्याशी लढा देण्यामध्ये अधिक प्रभावी असतात. एका संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे की, सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी याची मदत होते. तसेच कॉफी प्यायल्यानेदेखील तुम्हाला चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

डोळ्यांचा थकवा दूर करते

कॉफीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे डोळ्यांखाली आलेली सूज, सुरकुत्या कमी होण्यासाठी कॉफीचा उपयोग होतो. कॉफी पावडर, त्यामध्ये वाटलेले डार्क चॉकलेट आणि पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि ते तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला लावा. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. ५-१० मिनिटे ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉश्चरायझर लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात बदल दिसेल. डोळेही तजेलदार दिसतील.