ब्रिटिश संशोधकांचा दावा

नियमित कॉफीचे सेवन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवसातून दररोज तीन ते चार वेळा कॉफीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला ‘टाइप टू मधुमेह’ होण्याचा धोका कमी असतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे.
ब्रिटनमधील आरहस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांना कॉफीमध्ये दोन प्रकारची संयुगे आढळून आली, जी आरोग्यासाठी हितकारक अशी आहेत. मधुमेहासारख्या आजाराला रोखण्यासाठी आणि त्यावर उपचारासाठी ही संयुगे उपयुक्त ठरणार आहे, असा या संशोधकांचा दावा आहे.
साधारणपणे ‘टाइप टू मधुमेहा’ला प्रतिबंध करण्यासाठी इन्सुलिनच्या वापरातून अन्नात ग्लुकोजमधून ऊर्जानिर्मिती केली जाते. स्वादुपिंडामार्फत इन्सुलीनची निर्मिती होत असते, पण त्याचे प्रमाण मर्यादित स्वरूपाचे असते. उच्च रक्तदाब असणाऱ्यामध्ये ग्लुकोजचे अतिप्रमाण शरीराला घातक ठरते. यामुळे कायमचे अंधत्व आणि मज्जातंतूवर आघात होण्याची शक्यतादेखील बळावते.
आनुवांशिकपणा आणि जीवनशैली टाइप टू मधुमेह बळावण्यास जबाबदार ठरते. पण कॉफीच्या सेवनामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यासाठी कॉफीतील कॅफेन कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता, पण संशोधनातून शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनवर कॅफेनचा काही काळापुरताच प्रभाव राहत असल्याचे पुढे आले आहे, तर दुसरीकडे कॅफेनविरहित कॉफीतूनही अशाच प्रकारचे संतुलन ठेवले जात असल्यामुळे याबाबतच्या दाव्यातही तथ्य नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
आरहस विद्यापीठाचे सोरेन ग्रेजर्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉफीमधील अन्य घटकांचे डेन्मार्कच्या रुग्णालयात केलेल्या परीक्षणानंतर कॅफेस्टोल आणि कॅफेक अ‍ॅसिड ग्लुकोजमधील इन्सुलिनला वेगळे करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचबरोबर कॅफेस्टोलमुळे विहित केलेल्या औषधाप्रमाणेच शरीरातील धमन्यांमधील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होत आहे, पण कॉफी फिल्टरच्या वापरामुळे कॅफेस्टोलचे प्रमाण कमी होत असल्यामुळे अन्य संयुगेदेखील दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Harsh Goenka shares video of new palm payment method in China Tech continues to simplify our lives
चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले