Benifits of eating Garlic: लसूण हा एक मसाला आणि औषधी वनस्पती आहे, जो आपण स्वयंपाकात औषध म्हणून आणि अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरतो. लसूण हा एक मसाला आहे जो सुपरफूड मानला जातो. अलीकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, आपल्या आहारात नियमितपणे लसूण समाविष्ट केल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य राहण्यास मदत होते.
हा अभ्यास चीनमधील साउथईस्ट युनिव्हर्सिटी आणि झिझांग मिंझू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या मते, लसूण खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य होण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते. लसणाच्या काही पाकळ्या तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात.
संशोधनानुसार, निरोगी व्यक्तींमध्ये लसूण खाल्ल्याने ग्लुकोज आणि लिपिड चयापचय नियंत्रित होण्यास मदत होते. ग्लुकोज आणि लिपिड चयापचय विकारांमुळे एथेरोस्क्लेरोसिस, मधुमेह आणि फॅटी लिव्हर रोग यांसारखे अनेक जुनाट आजार होऊ शकतात. सायन्स अलर्टमधील एका अहवालानुसार, लसूण चांगल्या आरोग्याशी जोडले गेले आहे.
कॅन्सरपासून बचाव
लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी काहीही न खाता लसूण चघळल्यास कॅन्सरचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
मधुमेहासाठी फायदेशीर
लसणात अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ पाकळ्या खाव्यात; याने साखर नियंत्रित राहण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते.
लसूण ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रित करते
संशोधनानुसार, ज्या सहभागींनी त्यांच्या दैनंदिन आहारात लसणाचा समावेश केला त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होती. उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्यांमध्येही वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. सायन्स अलर्टमधील एका अहवालानुसार, लसूण खाल्ल्याने रक्तातील साखर सामान्य होण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते.
लसणाची प्रभाविता सिद्ध करण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नसला तरी असोसिएशन असे सुचवते की, लसूण ग्लुकोज आणि लिपिड पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते, असे सायन्स अलर्टने म्हटले आहे. लसूण कच्चा, अर्काच्या स्वरूपात तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात सेवन केला जाऊ शकतो. अभ्यासातून असे आढळून आले आहे की, लसणात अॅलिसिन असते, जे एक अँटीऑक्सिडंट संयुग आहे जे रक्तातील साखर, रक्तातील लिपिड्स आणि आतड्यातील मायक्रोबायोमशी जोडलेले आहे. दररोज दोन कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यानं आरोग्यावर चांगेल परिणाम होऊ शकतात.
नैराश्य दूर होईल
लसणाचे सेवन मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे, याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
वजन कमी होईल
जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. त्यात अशी काही संयुगे आढळतात, जी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
