Benefits Of Amla For Skin And Body : कोलेजन हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. कोलेजन हे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे जे पेशी आणि टिश्यूंची (ऊतींची) काळजी घेतात. कोलेजनमुळे तेजस्वी त्वचा, सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे कोलेजनयुक्त उत्पादने मार्केटमध्ये देखील महाग मिळतात. पण, आज आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त एक उपाय घेऊन आलो आहोत ; ज्याचे नाव आवळा.
आवळा तुमच्या आहारात आणि स्किनकेअर रुटीनमध्ये फेसपॅक ते अगदी चटण्यांपर्यंत विविध प्रकारे समाविष्ट केले जाऊ शकतो. त्यामुळे आवळा कोलेजन उत्पादन कसे वाढवतो, चमकदार त्वचेसाठी त्याचा फायदा कसा होतो? त्याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…
सुरवातीला कोलेजन म्हणजे काय ते समजून घेऊ (What is collagen)
कोलेजन हे शरीरात आढळणारे एक विशेष प्रकारचे प्रथिन आहे. कोलेजन हे प्रामुख्याने त्वचा, केस, नखे, हाडे, सांधे आणि रक्तपेशींमध्ये आढळते. कोलेजनसारखे प्रथिने त्वचेला आतून पोषण देतात आणि त्वचा लवचिक, सुंदर बनवतात. जसजसे व्यक्तीचे वय वाढते तसतसे शरीरात कोलेजनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे त्वचा सैल आणि त्वचेवर सुरकुत्याची समस्या उद्भवते.
मग आवळा खाल्ल्याने कोलेजन वाढते का?
आवळा हे एक सुपरफूड आहे. कारण – त्यात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. शरीरात कोलेजन संश्लेषणासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक पोषक तत्व म्हणून काम करतात. आवळा खाल्ल्याने शरीराला मिळणारे व्हिटॅमिन सी एंजाइम म्हणून काम करतात. त्यामुळे आवळा शरीरात कोलेजन तयार होण्यास मदत करतात. जेव्हा शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते तेव्हा कोलेजन चांगल्या प्रकारे तयार होतात. म्हणूनच, असे म्हटले जाते की, आवळा खाल्ल्याने शरीरात कोलेजन वाढते.
आवळा आणि कोलेजन
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , पॉलिफेनॉल, टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात. आवळा खाल्ल्याने त्वचेतील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते, मुक्त रॅडिकल्स म्हणजे त्वचेचे वृद्धत्व होण्याचे मुख्य कारण. तर कोलेजन मुक्त रॅडिकल्सचे विघटन आणि त्वचेचे वृद्धत्व कमी होण्यास मदत करतात. आवळ्यातील पोषक तत्वे त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. आवळा शरीरात कोलेजन वाढवतो तसेच त्याची गुणवत्ता सुधारतो.
कोलेजन वाढवण्यासाठी आवळ्याचे कशाप्रकारे सेवन करायचे (How to consume amla to increase collagen)
कोलेजन वाढवण्यासाठी तुम्ही आवळा अनेक प्रकारे खाऊ शकता. जसे की…
- दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ तुकडा कच्चा आवळ्याचा तुकडा खा.
- नाश्त्यानंतर, कोमट पाण्यात १० ते १५ मिली आवळ्याचा रस मिसळून प्या.
- १ चमचा आवळा पावडर, मध कोमट पाण्यात घालून त्याचे सेवन करू शकता.