These Superfoods Bad For Health: निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. जरी आपण चांगला आहार घेतला तरी तो अपूर्ण असू शकतो, अशावेळी सुपरफूड्स ही उणीव भरून काढतात. हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक रील्समध्ये सुपरफूड्स हा शब्द तुम्ही वारंवार ऐकत असाल. मागील काही काळात आरोग्य आणि फिटनेस जगात हा शब्द लोकप्रिय झाला आहे. तो आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांसह अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारख्या पोषक तत्वांचा पुरवठा करतो.
सुपरफूड्सचा वापर विशेषतः अशा पदार्थांचे वर्णन करण्यासाठी केला जातो, ज्यात जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि कॅलरीज कमी असतात. असे अनेक सुपरफूड्स आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत; तर काही असे आहेत जे जास्त प्रमाणात सेवन करू नयेत. असे केल्याने ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
‘या’ सुपरफुड्सचे सेवन आरोग्यासाठी घातक
लेंडी पिंपळी
लेंडी पिंपळी ही औषधी वनस्पती तिच्या आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्याच्या फळाला छोटी पिंपळी किंवा लांब मिरचीदेखील म्हणतात. याचा वापर अन्न पदार्थाला चव देण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. ग्लायकोसाइड्स, युजेनॉल, अल्कलॉइड्स, टेरपेनॉइड्स आणि इतर नैसर्गिक संयुगांनी समृद्ध असलेल्या पिंपळीमध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत.
आहारात या सुपरफूडचा समावेश केल्याने रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास, वजन कमी करण्यास मदत होऊ शकते आणि मासिक पाळीच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. शिवाय ते पचनशक्ती वाढवते आणि अतिसारसारख्या समस्या कमी करते.
मात्र, याचे अनेक फायदे असूनही, या औषधी वनस्पतीचे जास्त सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ दोष असंतुलित होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने अपचन, पोटदुखी, खाज सुटणे, लालसरपणा आणि त्वचेवर सूज येऊ शकते.
अॅपल सायडर व्हिनेगर
आजकालच्या सर्वात लोकप्रिय सुपरफूडपैकी एक म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगर आहे. याचा वापर बहुतेक लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी करतात. पण, जास्त प्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. हे आंबवलेले पेय आंबट आणि आम्लयुक्त असते, ज्यामुळे वात, कफ आणि पित्त प्रभावित होतात; यामुळे पाचक रसांचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला आम्लयुक्त वाटू शकते. जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने त्वचेची जळजळ आणि पोटात अल्सर होऊ शकतात.
मीठ
मिठाशिवाय कोणतेही अन्न चवीला रूचकर लागत नाही. स्वयंपाकघरात त्याचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. बहुतेक मिठात आयोडीन असते, जे पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत करणारे एक ट्रेस मिनरल असते. तथापि, त्यात सोडियमचे प्रमाणदेखील लक्षणीय असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते.
आयुर्वेदात असे म्हटले आहे की, जास्त मीठ सेवन केल्याने रक्त प्रदूषित होतेच, शिवाय तहान लागणे, चक्कर येणे, जळजळ होणे आणि त्वचेचे विकारदेखील होऊ शकतात. प्रौढ व्यक्तीसाठी दररोज ५ ग्रॅम मीठ पुरेसे आहे. यापेक्षा जास्त मीठ आरोग्यासाठी चांगले नाही.

