Baking Soda: बेकिंग सोडा, ज्याला सोडियम कार्बोनेट, असेही म्हणतात. त्याचा वापर अन्नात, विशेषतः केक, ब्रेड व ढोकळा यांसारख्या पदार्थांमध्ये अनेक स्वरूपात वापरला जातो. लोक अनेकदा अन्न लवकर शिजावे आणि ते कुरकुरीत व्हावे यांसाठी बेकिंग सोडा वापरतात. त्यामुळे अन्न चविष्ट बनते; पण तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्याच वेळी काही लोकांना सोडा वॉटर पिण्याची सवयदेखील असते, ज्यामुळे तुमच्या शरीराचे घातक नुकसान होऊ शकते आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तो अधूनमधून खाणे ठीक आहे; तथापि तो दररोज किंवा त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. दररोज बेकिंग सोड्याचे सेवन केल्याने तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते आणि इतर अनेक रोगांचा धोका वाढू शकतो. बेकिंग सोड्यात सोडियम बायकार्बोनेट असते. त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात सोडियमची पातळी वाढू शकते आणि शरीराचे इतर अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.
बेकिंग सोड्याचे अति सेवन घातक
- बहुतेकदा बेक्ड पदार्थांचे सेवन हे पोटफुगी आणि गॅस होण्याचे एक कारण असू शकते. कारण- जवळजवळ सर्व बेक्ड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकिंग सोडा वापरला जातो. हे सेवन पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते. बेकिंग सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट नावाचे संयुग असते आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात सोडियमची पातळी वाढू शकते.
- सोडियम जास्त झाल्यामुळे शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा व थकवा येऊ शकतो
- बेकिंग सोड्याचे जास्त काळ सेवन केल्याने तुमच्या मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते. त्याचे जास्त प्रमाणातील सेवन केल्याने मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि मूत्रपिंडांच्या समस्या उदभवू शकतात.
- बेकिंग सोड्याच्या अतिसेवनामुळे अतिसारदेखील होऊ शकतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
- सोड्याचे दररोज सेवन केल्याने गॅस, वजन वाढणे व पोटफुगी यांसारख्या समस्यादेखील उदभवू शकतात. सोडा वॉटरमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे टाईप-२ मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. सोडा शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढवतो, ज्यामुळे गाऊटसारखे आजार होऊ शकतात.
बेकिंग सोड्याऐवजी हे वापरा
- बेकिंग सोडा घालण्याऐवजी, चणे, राजमा, मसूर आणि बीन्स शिजवण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजवा. यानंतर, जेव्हा ते उकळतील तेव्हा ते पूर्णपणे शिजतील. (की- चणे, राजमा, मसूर व बीन्स लवकर शिजण्यासाठी त्यात बेकिंग सोडा घालण्याऐवजी ते काही तास पाण्यात भिजवा. त्यानंतर जेव्हा ते उकळतील तेव्हा ते पूर्णपणे शिजलेले असतील.)
- इडली, डोसा यांसारख्या पदार्थांना यीस्टची आवश्यकता असते. तुम्ही त्यात बेकिंग सोड्याऐवजी लिंबू वापरू शकता. केक आणि ढोकळ्यांसारख्या पाककृतींमध्ये तुम्ही फळांचे मीठ किंवा पौष्टिक यीस्ट वापरू शकता. त्यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्यही वाढेल.
बेकिंग सोड्याचे इतर फायदे
दात पांढरे करण्यासाठी
सततच्या खाण्यामुळे दातांमध्ये पिवळेपणा जमा होऊ लागतो. अशा वेळी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून घासल्याने दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. एवढेच नाही, तर हा एक प्रकारे नॅचरल माउथवॉश आहे; जो श्वसनाची दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू साफ करण्यात मदत करतो.
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी
काही लोकांना खूप जास्त घाम येतो; खराब जीवाणूंमुळे असे होते. घामाचा वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त मानला जातो. त्यासाठी पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि अंडरआर्म्स किंवा ज्या ठिकाणी जास्त घाम येतो, तेथे तो स्प्रे करा. त्यामुळे तुमच्या शरीरातील पीएच पातळी सुधारते आणि दुर्गंधी निर्माण करणारे खराब जीवाणू काढून टाकण्यास मदत होते. परिणामत: घामाचा वास कमी होतो आणि शरीराची दुर्गंधी दूर होते.
फळे आणि भाज्यांवरील कीटकनाशके दूर करण्यासाठी
फळे आणि भाज्यांवर फवारलेल्याकीटकनाशकांचा प्रभाव दूर टाकण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. भाज्या आणि फळे स्वच्छ करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. मग त्या द्रावणाने फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्याने कीटकनाशकांचे दूषितत्त्व नष्ट होईल.
किचनवरील हट्टी डाग काढण्यासाठी
बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील सिंक, टाइल्स, चॉपिंग बोर्ड किंवा किचन प्लॅटफॉर्मवरील साचलेली घाण, हट्टी डाग साफ करण्यास मदत करतो. त्यासाठी व्हाईट व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा मिसळून अनेक डाग सहज काढता येतात.

