Diabetes and Guava leaf : आहारातील निर्बंध आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यांमुळे आजकाल देशात मधुमेह वेगाने हात-पाय पसरत आहे. आजकाल अंदाजे चारपैकी एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळू लागले आहे. हा आजार शरीराला हळूहळू आतून नष्ट करतो म्हणूनच त्याला ‘मंद मृत्यू’ (सायलेंट किलर), असेही म्हणतात. पेरू हे बहुतेक लोकांचे आवडते फळ आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, पेरूचे अनेक औषधी आणि आरोग्यदायी फायदे आहेत.

पेरू हे फळ आरोग्यदायी आहेच; पण त्याची पानेदेखील खूप फायदेशीर आहेत. पेरूची पाने अनेक आजारांवर पारंपरिक औषध म्हणूनदेखील वापरली जातात. पेरूच्या पानांचा अर्क पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि अॅलर्जीदेखील कमी करते. त्याशिवाय पेरूच्या पानांचा रस प्याल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

पेरू मधुमेहासाठी चांगला आहे का?

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने मान्यता दिलेल्या संशोधन संस्थेच्या ब्रीद वेल बीईंगनुसार, पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्याचा अर्थ त्याचे पचन आणि शोषण हळूहळू होते, ज्यामुळे ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते. पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जास्त वजन हे मधुमेहासाठी एक योगदान देणारे घटक आहे. USDA नुसार, अंदाजे १०० ग्रॅम पेरूमध्ये नऊ ग्रॅम नैसर्गिक साखर आणि फक्त ६८ कॅलरीज असतात. पेरूमध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते, ज्यामुळे ते मधुमेहासाठी आहारातील आवश्यकतांपैकी एक बनते.

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी उत्कृष्ट बनते. त्याशिवाय पेरूमध्ये संत्र्यांपेक्षा चार पट जास्त व्हिटॅमिन सी असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. ते मधुमेहासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांशी लढण्यासदेखील मदत करते.

पोषक तत्त्वांनी समृद्ध

हेल्थलाइनच्या मते, मधुमेही रुग्णांनी पेरूचे पदार्थ खावेत, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते. अशा परिस्थितीत पेरू खाणे खूप उपयुक्त ठरू शकते. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी व फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे इन्सुलिन उत्पादनास मदत करतात आणि मधुमेहाचा विकास रोखतात. हे गोड फळ मधुमेही रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. हे फळ खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

पेरूच्या पानांचा चहा कधी प्यावा?

आयुर्वेदानुसार, पेरूच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात उकळून पेरूची पाने खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पेरूच्या पानांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. ब्रीद वेल बीईंगनुसार, पेरूची पाने पाण्यात उकळल्याने पेरूचा रस तयार होतो. या अर्कामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी व फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या पानांचा अर्क इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारतो, ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारतो.

रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त

NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पेरूच्या पानांचे पाणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास प्रभावी आहे. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असलेल्या लोकांसाठी ही पाने फायदेशीर आहेत. हा धोका कमी करण्यासाठीदेखील पानांचा अर्क खूप उपयुक्त आहे.