हिवाळ्यात ‘या’ ४ खास टिप्सद्वारे तुम्ही रक्तातील साखर ठेवू शकता नियंत्रणात, जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात साखर नियंत्रणात ठेवली नाही तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. (photo credit: jansatta)

मधुमेह हा एक सायलेंट किलर आजार असून त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात साखर नियंत्रणात ठेवली नाही तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना थंडी जास्त त्रासदायक असते. या ऋतूत शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे थंडी जास्त जाणवू लागते. मधुमेहाचा परिणाम केवळ किडनीवरच नाही तर रक्ताभिसरणावरही दिसून येतो.

थंड वातावरणात शरीराचे कार्य आणि इन्सुलिन तयार करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. या ऋतूत कमी तापमानामुळे रक्त घट्ट होते आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी अधिक इन्सुलिनची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, विशेषतः हिवाळ्यात शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात साखर नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करा

हिवाळ्यात साखर नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. जास्त वेळ व्यायाम करणे आवश्यक नाही. व्यायामामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

तणाव कमी करा

करोनाच्या काळात तणावाचे लोकांवर वर्चस्व आहे, वाढत्या तणावामुळे अनेक आजार होतात. शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहा. तणाव कमी करण्यासाठी ताज्या हवेत १० मिनिटे चाला. विश्रांतीचे व्यायाम करा.

साखरेची नियमित चाचणी करा

साखर नियंत्रित करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा. साखर तपासून तुम्हाला साखरेची वाढ आणि घसरण कळेल. तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत कोणताही मोठा बदल दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

शरीर उबदार ठेवा

थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घाला. शरीर उबदार ठेवण्यासाठी आहारात सूप सेवन करा.

शरीर हायड्रेटेड ठेवा

साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेहच्या रुग्णांने त्यांचे शरीर हायड्रेटेड ठेवा. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डायबेटिक केटोअॅसिडोसिस होऊ शकतो. हिवाळ्यात मधुमेहच्या रुग्णांनी पाणी पिण्याची काळजी घ्यावी.

ड्रायफ्रुट्सचे सेवन करा

हिवाळ्यात साखरेच्या रुग्णांनी शरीराला ऊर्जा देण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन करावे. ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि अक्रोड खा. त्यामध्ये असंतृप्त चरबी, प्रथिने आणि अनेक प्रकारची खनिजे असतात जी चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Controlling blood sugar during the winter know the best tips to control sugar scsm

Next Story
वजन कमी करण्यासाठी खास उपाय; ‘या’ चार प्रकारच्या चहाचे सेवन ठरणार फायदेशीर
फोटो गॅलरी