Cooking Hacks : डाळ, भाजी बनवताना फोडणी चांगल्याप्रकारे दिली तर त्याची चव वाढते. मात्र, फोडणी देताना तेल आणि मोहरीसारख्या मसाल्यांचे शिंतोडे किचनवर उडतात, ज्यामुळे संपूर्ण किचनच्या टाइल्स, ओटा खराब होतो, जो स्वच्छ करणं अनेकदा त्रासदायक काम वाटते. उडलेल्या शिंतोड्यांचे डाग साफ करण्यासाठी अनेक पर्याय असले तरी ते उडूच नये यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे असा विचार मनात येतो. जर तुम्हीही असा उपाय शोधत असाल तर खालील टिप्स फॉलो करा, ज्यामुळे फोडणी देताना तेल मसाल्यांचे डाग टाइल्स किंवा ओट्यावर उडून संपूर्ण किचन खराब होणार नाही.
फोडणीचं तेल उडण्याचं नो टेन्शन, फॉलो करा फक्त ‘या’ ट्रिक्स
१) गॅस कमी ठेवा
फोडणीसाठी तेल किंवा तूर गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवा किंवा पूर्णपणे बंद करा, ज्यामुळे जास्त तेल उडणार नाही आणि किचनदेखील अस्वच्छ होणार नाही.
२) भाज्यांमध्ये पाणी ठेवू नका
फोडणी देताना किंवा मसाले घालताना भाज्या, चिकनमध्ये पाणी राहू नये. ओल्या भाज्या तेलात टाकताच त्यातील पाण्याचे शिंतोडे किचनच्या ओट्यावर उडू लागतात, त्यामुळे फोडणीला देताना भाज्यांमधील पाणी पूर्णपणे काढून टाका.
३) खोलगट भांडं वापरा
फोडणी देण्यासाठी नेहमी खोलगट भांडं वापरा, यामुळे तेल किंवा मसाल्यांचे शिंतोडे कमी उडतात आणि किचनमध्ये घाणही कमी पसरते.
४) तेलात मीठ घाला
बऱ्याचदा तुम्ही जेव्हा चटणी किंवा सांबारमध्ये मोहरी आणि कढीपत्ता फोडणी करून घालता तेव्हा ते तडतडून भांड्यांना चिकटते. अशावेळी मोहरी तडतडू नये यासाठी तेलात थोडे मीठ घाला, यामुळे फेडणी देताना मोहरी उडणार नाही. या ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता.
