scorecardresearch

Cooking Oil: हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी ‘या’ ५ खाद्यतेलांचा आहारात करा समावेश

स्वयंपाकासाठी तेल निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की असे तेल निवडा जे आपले हृदय निरोगी ठेवते आणि लठ्ठपणा देखील नियंत्रणात ठेवते.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, पचायला सोपे असे खाद्यतेल निवडावे. (photo credit: freepik)

स्वयंपाक करताना खाद्यतेल हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग असून आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. खाद्यतेलामुळे आपल्या जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, खाद्यतेलाची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. खाद्य तेल तसेच तेलावरील लेबल पाहून निवडू नये, तर आरोग्य लक्षात घेऊनच करावे. आजकाल सर्व खाद्यतेलावर हे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे लेबल लावले जाते, पण तेलावरील असे लेबल लोकांना गोंधळात टाकतात.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, पचायला सोपे असे खाद्यतेल निवडावे, ज्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा थ्री आणि कॅरोटीन असते. स्वयंपाकासाठी तेल निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की असे तेल निवडा जे आपले हृदय निरोगी ठेवते आणि लठ्ठपणा देखील नियंत्रणात ठेवते.

जर तुम्ही आधीच हृदयविकाराने त्रस्त असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. काही खाद्यतेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असतात आणि आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. तुम्हाला अशाच ५ प्रकारच्या कुकिंग ऑइलबद्दल सांगत आहोत जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेईल.

ऑलिव्ह ऑईल वापरा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑईल हृदयाला निरोगी ठेवते. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात जे हृदय निरोगी ठेवतात. या तेलाचा स्मोक पॉइंट कमी असतो, त्यामुळे ते मंद आचेवरच शिजवावे.

शेंगदाणा तेल हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी

खाद्यतेलामध्ये शेंगदाणा तेल हृदयासाठी सर्वोत्तम मानले जाते. हे तेल व्हिटॅमिन ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध आहे. व्हिटॅमिन ई हृदय निरोगी ठेवते. हे तेल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. ओमेगा-६ आणि ओमेगा- फॅटी ऍसिडचे संयोजन राखण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळलेले शेंगदाणा तेल देखील वापरू शकता.

सूर्यफूल तेल

व्हिटॅमिन ईने समृद्ध असलेले सूर्यफूल तेल हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओमेगा ६ फॅटी ऍसिड हे पोषक तत्वांनी युक्त तेलामध्ये असते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी मर्यादित प्रमाणात सेवन करा.

सोयाबीन तेल

सोयाबीनपासून सोयाबीन तेल काढले जाते. यामध्ये भरपूर फॅटी अॅसिड असते ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या कमी होतात.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल केवळ हृदयालाच नाही तर त्वचा, सांधे आणि शरीराच्या इतर भागांनाही फायदेशीर ठरते. हे तेल मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्समध्ये समृद्ध आहे. मोहरीचे तेल पचनास मदत करते आणि भूक सुधारते असे मानले जाते.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cooking oil use these 5 best cooking oil for heart health know its benefits scsm