Cooler Cleaning Jugaad Goes Viral: उन्हाळा सुरू झाला की, घराघरात कूलरची पुन्हा एंट्री होते… पण यंदा एक व्हिडीओ लोकांना फक्त थंडावा देत नाही, तर डोक्यात एक मोठा प्रश्नही निर्माण करतोय. कूलर सुरू करण्याआधी ‘हे’ केलं, तर खरंच काय फरक पडतो?

सध्या देशभरात तापमानाने अक्षरशः कडाक्याची पातळी गाठली आहे. अशा वेळी एसी परवडत नसलेल्या अनेक घरांसाठी कूलर हा मोठा आधार असतो. पण, अनेकदा लोक एक चूक करतात आणि ती म्हणजे महिनोन्‌ महिने बंद असलेला कूलर तसाच सुरू करतात. मग तिथेच सुरू होतो त्रास… गरम हवा, कुबट वास आणि अजब आवाज!

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला कूलर सुरू करण्याआधी काहीतरी वेगळंच करते… आणि ते पाहून लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण- हा उपाय इतका सोपा आहे की, तो प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या साह्याने करता येतो. पण, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतेकांना याबद्दल माहितीच नव्हती.

Award Banner

व्हिडीओमध्ये दिसतं की, महिला सर्वप्रथम एक साधा बाऊल घेते. त्यात काही सामान्य दिसणाऱ्या गोष्टी टाकते… पण पुढे जे घडतं, तेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. हे मिश्रण तयार केल्यानंतर ती थेट कूलरच्या पार्टसवर वापरते. मग काही मिनिटांतच जणू काही जादू घडते आणि घाण, डाग व दुर्गंधी गायब होऊ लागते…

हा व्हिडीओ पाहणारे अनेक जण कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारत आहेत, “हे आधी कुणी कसं सांगितलं नाही?” कारण- साबण, सर्फ, केमिकल वापरूनही जे होत नाही, ते हा साधा जुगाड करून दाखवतो, असं अनेकांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे या उपायामागे कोणतंही महागडं प्रॉडक्ट नाही. उलट घरात सहज मिळणाऱ्या वस्तूंनी हा प्रयोग केला जातो. त्यासाठी खर्चही नाही आणि मेहनतही कमी. पण, तरीही एक मोठा प्रश्न कायम राहतो आणि हा उपाय प्रत्येक कुलरसाठी तितकाच प्रभावी आहे का?

व्हिडीओत दाखवल्यानुसार, महिलेने एक बाऊल घेतला आणि त्यात व्हाईट व्हिनेगर टाकलं. त्यानंतर त्यात थोडासा बेकिंग सोडा घातला आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून हे मिश्रण तयार केलं. दिसायला अगदी साधं असलेलं हे मिश्रणच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

त्यानंतर ती स्क्रबच्या मदतीने कूलर स्वच्छ करायला सुरुवात करते. कूलरचे बाहेरील भागच नाही, तर आतले सर्व पार्टस् ती नीट घासून काढते. विशेष बाब म्हणजे कूलिंग पॅडही याच मिश्रणाने स्वच्छ केले जाते. काही वेळातच जमा झालेली घाण आणि चिकटपणा निघून जात असल्याचं व्हिडीओत दिसतं.

पण इथेच स्वच्छता कार्य संपत नाही…

महिलेने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे – कूलरमधील पाणी वेळोवेळी बदलणं खूप गरजेचं आहे. जर पाणी तसंच ठेवलं, तर दुर्गंधी परत येऊ शकते. मात्र, हा उपाय नियमित केल्यास कूलरमधून येणारा वास पूर्णपणे कमी होऊ शकतो, असा तिचा दावा आहे.

व्हिडीओमध्ये महिलेने एक महत्त्वाची गोष्टही सांगितली आहे. फक्त बाहेरून साफ करणं पुरेसं नाही, तर कूलिंग पॅड आणि पाण्याची स्वच्छतासुद्धा तितकीच गरजेची आहे. पाणी वेळोवेळी बदललं गेलं नाही, तर वास परत येऊ शकतो, असंही ती सांगते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. काहींनी हा उपाय करून पाहिल्याचं सांगितलं, तर काही अजूनही ट्राय करण्याच्या विचारात आहेत. मात्र, एक गोष्ट नक्की की, या छोट्या जुगाडाने लोकांच्या उत्सुकतेला जोरदार उधाण आलं आहे.

येथे पाहा व्हिडीओ

तर मग… तुम्हीही कूलर सुरू करण्याआधी हा जुगाड करून पाहणार आहात का? की आधी इतरांचा अनुभव ऐकून मगच निर्णय घेणार? कारण- कधी कधी छोटा उपाय मोठा फरक घडवतो… पण तो खरंच किती प्रभावी आहे, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं!

Vlogger surbhi Kashyap या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)