Kothimbir Plant at Home: कोथिंबीर ही भारतीय किचनमध्ये रोज वापरात येते. त्याचा सुगंध आणि चव कोणत्याही पदार्थात जीवंतपणा आणतो. बाजारातून आणलेली कोथिंबीर बऱ्याचदा काही दिवसांत सुकते किंवा कुजते. अशा परिस्थितीत, तुम्ही घरच्या घरी स्वतः कोथिंबीरीचं छोटं रोपटं लावू शकता. त्यामुळे तुम्हाला ताजी तर मिळेलंच पण तुम्हाला वारंवार बाजारात जाण्याचीही गरज भासणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे कोथिंबीर घरीच पिकवणे खूप सोप्प आहे आणि त्यासाठी कोणत्याही विशेष अनुभवाची आवश्यकता नाही.

प्रथम किमान ६ ते ८ इंचाची कुंंडी किंवा एखादे भांडे निवडा. रुंदी जितकी जास्त असेल तितकी जास्त कोथिंबीर लागवड करता येईल. जर तुमच्याकडे कुंडी नसेल तर प्लास्टिक ट्रे, बादली किंवा जुना डब्बा देखील वापरता येईल, फक्त त्याच्या तळाशी पाणी बाहेर काढण्यासाठी एक छिद्र असावे. कोथिंबीरची मुळे फार खोलवर जात नाहीत म्हणून कुंडी खूप खोल असण्याची गरज नाही, परंतु रुंदी रोपांना पसरण्यास मदत करते.

कोथिंबीर लागवड करण्यासाठी,आता सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेऊ या ती म्हणजे माती. कोथिंबीर पिकवण्यासाठी माती नाजूक आणि पोषक तत्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. मातीत तुम्हाला दोन गोष्टी घालाव्या लागतील. पहिली म्हणजे शेणखत (किंवा गांडूळखत), जे मातीला पोषक तत्वे पुरवते आणि दुसरी म्हणजे वाळू किंवा कोकोपीट, जी माती हलकी आणि पाण्याचा निचरा होण्यास अनुकूल बनवते. या दोन्ही गोष्टी मिसळून तुम्ही अशी माती तयार करता ज्यामध्ये ओलावा राहतो पण पाणी साचत नाही.

आता धणे घ्या. धणे तसेच घ्यायचे नाहीत. बाजारात उपलब्ध असलेले धणे हलक्याच कुस्करून घ्या जेणेकरून त्याची साल फुटेल आणि धणे दोन भागात विभागले जातील. यामुळे अंकुर वाढण्यास जलद आणि चांगली मदत होईल. धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, यामुळे त्यांची साल मऊ होईल आणि त्यांची अंकुर लवकर वाढेल. दुसऱ्या दिवशी सकाळी, धणे गाळून मातीच्या पृष्ठभागावर पसरवा आणि त्यावर मातीचा हलका थर घाला. नंतर स्प्रे बाटलीतून पाणी शिंपडा जेणेकरून माती ओली होईल पण जास्त पाणी राहणार नाही.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी हलके पाणी कुंडीत घाला आणि कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे हलका सूर्यप्रकाश पडतो. जास्त उष्णता किंवा तीव्र सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण करा कारण यामुळे झाड लवकर सुकू शकते. ६-७ दिवसांत, लहान कोथिंबीरची रोपे उगवू लागतील आणि सुमारे ३ आठवड्यांत तुम्ही हिरव्या कोथिंबीरची पाने तोडून वापरण्यास सुरुवात करू शकता. लक्षात ठेवा, संपूर्ण रोप कापू नका. फक्त वरची पाने तोडून टाका जेणेकरून झाडाची वाढ होत राहील. घरी कोथिंबीर वाढवणे हे फक्त सोपे नाही तर ताजेतवाने आणि समाधानकारक देखील आहे. थोडासा संयम, योग्य माती आणि नियमित पाणी दिल्यास, तुम्ही तुमच्या किचनमध्ये प्रत्येक ऋतूत कोथिंबीर उगवू शकता.






This quiz is AI-generated and for edutainment purposes only.