Corinder Leaves And Pudina: कोथिंबीर आणि पुदीना बाजारातून आणल्यानंतर एक-दोन दिवसातच सुकू लागतात. अशा परिस्थितीत त्यांना जास्त काळ साठवून ठेवणे खूप कठीण असते. शिवाय त्यांचा ताजेपणा कमी झाल्यामुळे त्यांचा सुगंधदेखील कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोथिंबीर आणि पुदीना दीर्घकाळ साठवून ठेऊ शकता.
कोथिंबीर साठवण्यासाठी ‘या’ पद्धती वापरा
बाजारातून नेहमी ताजी कोथिंबीर खरेदी करा. घरी आणल्यानंतर कोथिंबिरीचे देठ एका ग्लासमध्ये पाण्यात घाला. नंतर ते स्टोअर करण्यासाठी कोथिंबिरीचे सर्व देठ काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कोथिंबिरीवरील पाणी सुकल्यानंतर ती एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.
पुदिन्याची पाने जास्त काळ साठवण्यासाठी
नेहमी बाजारातून स्वच्छ आणि चांगली पुदिन्याची पाने खरेदी करा. घरी आणल्यानंतर पाने पाण्याने धुवा आणि पुदीना सुकल्यानंतर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. त्यानंतर तुम्ही पुदिन्याची पाने फ्रिजमध्येदेखील किंवा प्लास्टिकच्या पिशवीतदेखील ठेवू शकता.