जुडिथ पार्सन, डीकिन विद्यापीठ.

तुमच्या लहान मुलांच्या सुरूवातीच्या काळात लसीकरण करताना आलेल्या अनुभवावरून पुढच्या काळात करू लागणाऱ्या इतर लसीकरणाच्या वेळी कसा परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज लावण्यात येतो. म्हणूनच नकारात्मक अनुभवाची शक्यता कमी करणं महत्वाचं आहे. परंतु पालक आपल्या मुलांना COVID-19 लस किंवा इतर इंजेक्शनसाठी तयार करण्यासाठी काय करू शकतात?

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
What should parents do to reduce childrens mobile usage
Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?

भीती किंवा फोबिया?

बहुतेक मुलांना सुयांची भीती वाटते. परंतु काही मुलांसाठी, भीती अधिक तीव्र असते आणि त्याची व्याख्या ‘लस फोबिया’ म्हणून केली जाऊ शकते. ‘लस फोबिया’ मध्ये सुई पाहणे किंवा ती घालणे ही एक अतिशय भयावह किंवा त्रासदायक प्रक्रिया वाटू लागते. उदाहरणार्थ, रक्त चाचणीसाठी इंजेक्शनमध्ये रक्त घेणे. याची चिंता आणि भीती ही धोक्याच्या प्रमाणाबाहेर असते आणि लोक शक्य तितक्या सुया लावण्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतात.

गंभीर प्रकरणांमध्ये, नुसत्या सुईकडे जरी पाहिलं तरी उद्भवलेल्या चिंतेमुळे चक्कर येणे, मळमळ, घाम येणे, चेतना कमी होणे आणि मूर्च्छित होणे अशा भावना निर्माण होतात. चार ते सहा वयोगटातील पाच मुलांपैकी एकाला (१९ टक्के) सुईंचा फोबिया असतो आणि १०-११ वर्षांच्या वयापर्यंत हे प्रमाण नऊपैकी एक (११ टक्के) कमी होते. प्रौढांमध्ये, सुमारे ३.५-१० टक्के लोकांना सुई फोबिया असतो. मुलांमध्ये ही भीती मागील रक्त तपासणी, इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांमुळे होऊ शकते.

नकारात्मक अनुभवाची शक्यता कमी करणे

लसीकरणासाठी अपॉईंटमेंट घेताना, तुम्ही नर्सला तयारीसाठी अतिरिक्त वेळ देण्यास सांगू शकता. जेव्हा मुले लसीकरणासाठी येतात, तेव्हा बहुतेक परिचारिकांना असं वाटतं की मुलं चिंताग्रस्त असू शकतात किंवा इंजेक्शनला खूप घाबरू शकतात.

चक्कर येण्यापासून रोखण्यासाठी, परिचारिका मुलांना ताणून नंतर त्यांचे स्नायू सोडण्यास सांगून मदत करू शकतात. दीर्घ श्वास घेणे, धरून ठेवणे आणि हळूहळू श्वास सोडणे ते सुचवू शकतात. सुईपासून मुलांचे लक्ष वळवण्यासाठी ते बोटे हलवण्यास सांगू शकतात.

जर मुलं स्पष्टपणे त्रास दर्शवत असेल, उदाहरणार्थ, ओरडणे, लाथ मारणे आणि त्यांना सुई नको आहे असे म्हणणे, त्यावेळी पालक मुलांचे लसीकरण पुढे ढकलू शकतात. जेणेकरून मुलांना प्रक्रिया समजून घेण्यासाठी संधी मिळेल. हे संभाव्यपणे सुई फोबिया आणखी वाढण्यापासून रोखू शकते. पालक त्यांच्या मुलांना चांगले ओळखतात आणि त्यांना लसीकरणासाठी कशी मदत करावी हे माहित असते.

आणखी वाचा : Vastu Tips : लग्न उशीरा होण्याची कारण असू शकतं वास्तुदोष, या उपायांनी दोष दूर करा

तुम्ही तुमच्या मुलांना कसे तयार करू शकता?

पहिली पायरी म्हणजे तुमच्या मुलांना लसींबद्दल कधी कळवायचं याचा विचार करणे. पाच वर्षांखालील मुलांसाठी, एका छोट्याश्या वेळेत सुद्धा चांगली तयारी करू शकता; उदाहरणार्थ, लसीकरणाच्याच दिवशी तयारी करणे. पाच ते सहा वर्षांच्या मुलांसाठी, तुम्ही त्यांना एक किंवा दोन दिवस अगोदर सांगू शकता आणि सात वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तुम्ही त्यांना एक आठवडा अगोदर सांगू शकता.

आणखी वाचा : Fashion Tips : ‘शरारा’च्या या पाच डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत, स्टायलिश एथनिक लुकसाठी एकदा ट्राय नक्की करा!

लसीकरणादरम्यान तुमच्या मुलास नकारात्मक अनुभव येत असल्यास, आणि तुम्हाला व्यावसायिक मदत घ्यायची असल्यास, तुमच्या GP (जनरल प्रॅक्टिशनर), स्थानिक प्ले थेरपिस्ट किंवा चाइल्ड लाईफ थेरपिस्ट तसंच तुमच्या क्षेत्रातील बाल मानसशास्त्रज्ञांकडून सूचना घेऊ शकता.