पालकांनो लक्ष द्या!. जी मुले कंपनीमध्ये दुधापासून तयार करण्यात येणारे पदार्थ किंवा गाईचे दूध सोडून इतर जनावरांचे दूध पितात, त्यांची उंची इतरांच्या तुलनेत कमी आढळून येते. गाईच्या दुधामुळे मुलांच्या उंचीमध्ये वाढ होत असल्याचा दावा नव्याने करण्यात आलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. कॅनडातील सेंट मायकेल रुग्णालयातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. जी मुले दररोज एक कप गाईचे दूध सोडून इतर दूध घेतात त्या मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत ०.४ सेंटिमीटरने कमी आढळून आली. आणि जी मुले गाईच्या दुधाचा नियमित एक कप घेतात त्यांची उंची इतर मुलांच्या तुलनेत ०.२ सेंटिमीटरने अधिक आढळून आली. हा उंचीतील फरक जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीसारखाच असल्याचे, सेंट मायकल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ जॉनथॉन मॅग्युअर यांनी म्हटले आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

जी मुले दररोज तीन कप गाईचे दूध सोडून इतर दूध घेतात त्यांच्या उंचीची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसते. जी मुले गाईचे दूध आणि इतर दूध यांचे मिo्रण घेतात त्यांची उंचीही इतर मुलांच्या तुलनेत कमी आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

उंची ही मुलाच्या आरोग्य आणि विकासासाठी अतिशय महत्त्वाचे सूचक आहे. अनेक पालक गाईव्यतिरिक्त दूध मुलांना देतात. मात्र त्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात पौष्टिक घटक उपलब्ध नसतात, असे त्यांनी सांगितले.

या संशोधनासाठी २४ ते ७२ महिन्यांच्या ५ हजार ३४ मुलांचा अभ्यास करण्यात आला. यातील १३ टक्के मुले गाईव्यतिरिक्त आणि ९२ टक्के मुले गाईचे दूध पीत होती. गाईच्या दुधाचे शरीरासाठी आवश्यक असणारे फायदे मागील काही वर्षांमध्ये लक्षात आल्यामुळे गाईचे दूध पिणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

हे संशोधन ‘क्लिनिकल न्यूट्रिशन’ या अमेरिकन नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.