|| वैद्य प्रभाकर शेंड्ये

गो-विज्ञान, गो-चिकित्सा, गो-औषधी, पंचगव्य चिकित्सा असे वेगवेगळे शब्द आपण ऐकले असतील. गोमूत्र, गोअर्क अशी विविध उत्पादने आपण बघितली अथवा वापरली असतील. या सर्वांचा आयुर्वेदात काय उपयोग आहे ते आपण आज बघू या.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

गोदुग्ध- गाईचे दूध हे सर्व धातूंची वाढ करणारे, बल वाढवणारे, क्षीण झालेल्यांना अत्यंत हितकर आहे. श्रम, खोकला, श्वास, जुना ताप यांचा नाश करणारे आहे.

गोघृत- हे पित्त दोषावरील परम औषध आहे. बुद्धी, स्मृती, आयुष्य वाढवणारे, अग्नी वाढवणारे आहे. लहान मुले तसेच वृद्धांना हितकारक आहे. अति भूक व अति तहान कमी करते. क्षीण झालेले, भाजलेले, क्षय, नागीण अशा रोगांमध्ये उपयुक्त आहे. तुपामध्ये विविध औषधे घालून ते संस्कारित केले असता ते हजारो रोगांवर उपयोगी ठरते.

गोदधि- गायीचे दही हे आंबट असून स्वभावाने उष्ण आहे. ते वात कमी करणारे परंतु कफ व पित्त वाढवणारे आहे. अरुची, काही मूत्रविकार यांमध्ये वापरता येते. अति दही खाल्ले असता त्वचा रोग, मधुमेह, ताप, विसर्प इत्यादी रोग होऊ  शकतात.

गोमूत्र- गोमूत्र हे तिखट, कडू, उष्ण आहे. ते क्षारीय असून ते अग्नी वाढवणारे व पचायला हलके आहे. ते पित्त वाढवणारे व कफ आणि वातनाशक आहे. उदरशूल, प्लीहा रोग, काही त्वचारोग, खोकला, सूज येणे, पांडू रोग, कान दुखणे अशा रोगांसाठी वापरले जाते.

गोमय- म्हणजे गाईच्या शेणाचा रस

या सर्वांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हटले जाते.

यापैकी घृत, दुग्ध, दही, व मूत्र हे आयुर्वेदात विविध औषधांमध्ये वापरले आहे. परंतु सर्व रोग यांमुळे बरे होतात, असे आयुर्वेदात कुठेही म्हटलेले नाही. त्यामळे पंचामृत अथवा पंचगव्य सर्वांनी रोज घ्यावे असे अजिबात नाही. तसेच रोज गोमूत्र पिणे हेही सर्वसामान्यांना सांगितलेले नाही. म्हणून वैद्यांना आपली प्रकृती दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.