विकेंडला जेवायला काही तरी स्पेशल हवंच असत. म्हणूनच विकेंडला आपण रेसिपीमध्ये नवनवीन प्रयोग आवर्जून करतो. खाण्यावरच्या प्रेमाला सीमा नसते. आजच्या इंटरनेटच्या जगात तर आपल्याला कोणत्याही देशातील, प्रांतातील रेसिपी सहज बघता येते. अन्न आणि संस्कृतीला नेहमीच जागतिक आकर्षण असते. शेफ रणवीर ब्रार यांनी नुकतीच पोस्ट केलेली लाहोरी मलाई कोफ्ताची ही रेसिपी याचे उत्तम उदाहरण आहे, शेफने “खाद्यपदार्थाला कोणतीही सीमा नसते हे पाककृती … प्रत्येक खाद्यपदार्थ एका प्रदेशातून प्रदेशात बदलत राहतात आणि एकेक नवीन विषय कळत जातात,” या मथळ्यासह रेसिपी शेअर केली आहे.

साहित्य

१ मध्यम आकाराचा बटाटा – उकडलेला आणि किसलेला

१५० ग्रॅम- किसलेले पनीर

५० ग्रॅम – मावा

चवीनुसार मीठ

१/२  टिस्पून – मिरपूड

१/२ इंच – किसलेले आले

एक चिमूटभर बेकिंग सोडा

१ टेबल स्पून –  कॉर्न फ्लाअर

तळण्यासाठी तेल

कोफ्त्याचे सारण

१/४ कप – सुकामेवा बारीक चिरलेला

चवीनुसार मीठ

१/२ चमचे –  ताजी चिरलेली कोथिंबीर

१/२  टीस्पून –  वेलची पूड

ग्रेव्हीसाठी

२ चमचे – तूप

२ चमचे – तेल

२ तमालपत्राची पान

३ ते ४ –  वेलची

६ ते ८ –  काळी मिरी

१/२  चमचे – जिरे

२ मध्यम आकारचे कांदे –  चिरलेले

१ टेबल स्पून – धणे पावडर

१ टेबल स्पून –  लाल तिखट

१/२ टीस्पून –  हळद

१ इंच – आले

३ ते ४ – लसूण पाकळ्या

२ मध्यम आकाराचे – चिरलेले टोमॅटो

१/२  कप – काजू

१ टेबल स्पून – तूप

१ टीस्पून – लाल तिखट

कृती

कोफ्त्यांसाठी

एका भांड्यात बटाटे, पनीर आणि मावा किसून घ्या. त्यात मीठ, मिरपूड, बेकिंग सोडा आणि किसलेले आले घाला. बाईंडिंगसाठी पीठ घाला. सारणासाठी मिक्सरच्या भांड्यात सुकामेवा, वेलची पूड आणि थोडसं कोफ्याचे मिश्रण घाला. आता कोफ्ता मिश्रण घ्या आणि त्याला गोल आकार द्या. गोलामध्ये जागा करून त्यात बनवलेलं सुकामेव्याच मिश्रण भरा. लिंबाच्या आकाराचे लहान गोळे बनवा.

ग्रेव्हीसाठी

एका कढईत तूप आणि तेल घाला. नंतर तमालपत्र, काळी मिरी, वेलची आणि जिरे घाला. जिरे तडतडायला सुरु होईपर्यंत शिजवा. आता कांदा घालून अर्धा शिजवा. नंतर धणे पूड, लाल तिखट, हळद आणि आले लसूण घाला. टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा. काजू घाला आणि मिक्स करा. एकदा हे सर्व शिजल्यावर,  आच बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिश्रण बारीक वाटून घ्या. हे मिश्रण गाळुन काढा. कढई घ्या, तूप आणि तेल घाला. ते गरम झाल्यावर लाल तिखट, कसुरी मेथी आणि मिश्रण घालून मिक्स करा. कोफ्ते एका प्लेटमध्ये सर्व्ह करा आणि मग त्यावरून मिश्रण घाला. वरून ताजी मलईने सजवायला विसरू नकात. आपल्या आवडीच्या रोटी, नान किंवा पराठे बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.