तुम्हाला तुमचे वजन वाढण्याची चिंता सतावत आहे का? नुसती काळजी करू नका त्याऐवजी यावर उपाय आहे याचा विचार करा. तुम्हाला जर खरोखर वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता तेही जिमला न जाता. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिमला जाण्याची आवश्यकता नाही. रोजच्या धावपळीत तुम्हाला जिमला जायला वेळ मिळत नसेल तर चिंता करू नका. तुम्हाला काही सोप्या टीप्स सुचवणार आहोत ज्यामुळे तुम्ही शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी आणि वजन करण्यासाठी मदत करतील.
वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त असतात. मात्र दिसवभराच्या कामांमध्ये आणि गडबडीमध्ये जिमला जाणे शक्य होत नाही. तुम्ही सुद्धा वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर आणि वजन कमी करण्यासाठी उपाय शोधात असाल तर आज आपण काही उपाय पाहणार आहोत. आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. या उपायांमुळे पोटावरील वाढलेले फॅट्स कमी होण्यास मदत होते.




जिऱ्याचे पाणी
एखादे डिटॉक्स ड्रिंक पिऊन देखील तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. जिऱ्याचे पाणी हे एक प्रभावी डिटॉक्स ड्रिंक आहे. जे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. ते पाणी प्यायल्याने पोटाचे फॅट्सकमी होण्यास मदत होते. एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले उकळावे. हे कोमट पाणी तुम्ही पिऊ शकता. तसेच तुम्ही हे रात्री भिजवून ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकता.
जवसाच्या बिया
वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. या बिया सकाळच्या वेळी किंवा जेवणामध्ये फळांसह खाऊ शकता. या बिया खाल्ल्या असता पोट भरल्यासारखे वाटते व वारंवार भूक लागणे देखील थांबते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सफरचंद आणि पेरू
सफरचंद किंवा पेरूचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत सफरचंद किंवा पेरूचे सेवन तुम्ही करू शकता. या दोन्ही फळांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. या फळांचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. तसेच आरोग्य देखील चांगले राहते.
गरम पाणी चालणे
गरम पाणी आणि चालणे या दोन उपायांमुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही जर का एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर २० मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. तसेच काही खाल्ल्यानन्तर तुम्ही २० मिनिटे चालू शकता. असे केल्यामुळे तुमचे फॅट्स देखील कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर गरम पाणी अवश्य प्यावे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)