High Cholesterol Remedies: वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण मानले जाते. गेल्या काही वर्षांत हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, खराब आहार आणि बिघडणारी जीवनशैली ही यामागची मुख्य कारणं आहेत. दैनंदिन दिनचर्येत शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, धूम्रपान आणि तेलकट तसंच मसालेदार अन्नाचे जास्त सेवन यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. आहारात वेळेवर सुधारणा, नियमित व्यायाम आणि निरोगी चरबीचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवता येतात आणि हृदयरोगांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
कोलेस्ट्रॉल शरीराच्या देखभालीचे काम करते. ज्याप्रमाणे सायकल किंवा कार सुरळीत चालण्यासाठी इंजिन ऑइलची आवश्यकता असते, त्याप्रमाणे शरीरालाही थोड्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. कोलेस्ट्रॉल शरीराची दुरूस्ती करण्यास, हार्मोन्स तयार करण्यास आणि पेशी मजबूत ठेवण्यास मदत करते. म्हणजेच कोलेस्ट्रॉल स्वत:च समस्या नाही. जेव्हा त्याचे प्रमाण वाढते आणि ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो आणि समस्या वाढवतात.
कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. जास्त एचडीएल कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये प्लेक तयार होतात. यामुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय?
ट्रायग्लिसराइड्सना तुम्ही शरीराचे ऊर्जा बचत खाते म्हणून शकता. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते. शरीराला आवश्यक असलेली सर्व ऊर्जा आणि भविष्यातील वापरासाठी साठवलेली अतिरिक्त ऊर्जा वापरते. या साठवलेल्या ऊर्जेला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. जास्त साखर, जास्त कार्बोहायड्रेट्स आणि जास्त खाण्यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि हे हृदयरोगाचे प्रमुख कारण असू शकते. जेव्हा शरीरात अतिरिक्त कॅलरीज चरबी म्हणून साठवल्या जातात तेव्हा लठ्ठपणा, डायबिटीज आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
आयुर्वेद आणि विज्ञानावर आधारित आरोग्य पद्धतींद्वारे आजारांवर उपाय देणारे डॉ. भूषण रिसर्च लॅबचे संस्थापक डॉ. भूषण यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्यासाठी एक सोपा विज्ञानावर आधारित घरगुती फॉर्म्युला आहे. ओट्स, अळशी आणि दालचिनी दह्यामध्ये मिसळून नाश्त्यात किंवा संध्याकाळाच्या नाश्त्यात खाल्ल्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स सहजपणे नियंत्रित करू शकता. दह्यासोबत या तीन गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. साखरेची लालसा नियंत्रित होते. अतिरिक्त साखर आणि कार्ब्स नियंत्रित करण्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त ठरते. दररोज ते खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्सच्या मूळ कारणावर हल्ला होतो.
ओट्सचा फायदा
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन असते. ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, बीटा-ग्लुकन पोटात एक जाड जेल बनवते. हे जेल रक्तप्रवाहात असलेल्या वाईट कोलेस्ट्रॉलला बांधते आणि ते शरीरातून काढून टाकण्यास मदत करते. हे कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहात शोषले जाण्यापासून रोखते.
अळशीच्या बिया नसा दुरूस्त करतात
अळशीच्या बियांमध्ये अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते, ते ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा एक प्रकार आहे. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अळशीच्या बियांमधील लिग्नान रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक किंवा वाईट चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करतात. ते ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करतात आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारतात.
दालचिनीचा वापर
दालचिनी सर्वात शुद्ध आणि सुरक्षित मानली जाते. दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड असते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ते एन्झाइम्सच्या हालचाली नियंत्रित करून शरीरात चरबी साठवण कमी करते. ते केवळ ट्रायग्लिसराइड्स कमी करत नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य करते, त्यामुळे शरीरात नवी चरबी तयार होण्यास प्रतिबंध होतो.
दही- प्रोबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत
दह्यातील चांगले बॅक्टेरिया थेट हृदयाच्या आरोग्याशी जोडलेले असतात. काही क्लिनिकल अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दह्याचे बॅक्टेरिया लिव्हरमधील कोलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी करू शकतात. ते पचन सुधारते, त्यामुळे फायबरचा प्रभाव दुप्पट होतो.
दह्यासोबत ओट्स, अळशी आणि दालचिनी
ओट्स २ चमचे, दही ४ ते ५ चमचे, हलकी कुटलेली अळशी १ चमचा चिमूटभर दालचिनी. हे सर्व घटक चांगले मिसळा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या. चवीसाठी १ ते ३ चमचे सफरचंद किंवा पपई घालू शकता. दररोज नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुमारे ५० ते ६० ग्रॅम कोरडे ओटमील खाऊ शकता. ते पाण्यात शिजवून त्याचे सेवन केल्यास उत्तम.
