scorecardresearch

नैराश्य कमी करण्यात फायदेशीर ठरते सीताफळ, ‘या’ समस्यांपासून देते आराम

हिरव्या रंगाचा सीताफळ हा फळ बाहेरून कडक असतो मात्र पिकल्यावर ते खायला गोड लागते. या फळाच्या आरोग्यदायी फायादांबाबत आपण जाणून घेऊया.

नैराश्य कमी करण्यात फायदेशीर ठरते सीताफळ, ‘या’ समस्यांपासून देते आराम
सीताफळ (pic credit – pixabay)

सीताफळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. केवळ हे फळच नव्हे तर त्याचे पान, मूळ आणि साल देखील फायदेशीर मानली जाते. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये या फळाचा वापर केला जातो. हिरव्या रंगाचा हा फळ बाहेरून कडक असतो, मात्र पिकल्यावर ते खायला गोड लागते. या फळाच्या आरोग्यदायी फायादांबाबत आपण जाणून घेऊया.

१) सीताफळाने मिळते भरपूर उर्जा

सीताफाळामध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे तुम्हाला त्यातून अधिक उर्जा मिळते आणि काम करण्यासाठी उर्जा लागते. त्यामुळे सीताफळ हे उर्जा मिळण्याचे चांगले स्त्रोत आहे. या फळामध्ये पोटॅशियम देखील अधिक प्रमाणात अढळते जे स्नायू कमजोर झाल्यास उपयुक्त ठरते आणि रक्ताभिसरणात फायदेशीर ठरते.

(Allergy : धुळीच्या एलर्जीने बेजार झालात? ‘या’ घरगुती उपचारांनी मिळू शकतो आराम)

२) हृदयासाठी उपयुक्त

सीताफळामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. एका छोट्या सीताफळापासून तुम्हाला १० ग्राम मॅग्नेशियम मिळते जे व्यक्तीसाठी पुरेसे मानले जाते. शरीरातील अनेक भागांच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशिय आवश्यक मानले जाते. तसेच ते हृदयाच्या स्नायूंना आराम देते आणि स्ट्रोकच्या धोक्याला कमी करते.

३) पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर

सीताफळाच्या सेवनाने पोटाच्या समस्या, अल्सर आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळू शकते. १०० ग्राम सीताफळापासून २.५ टक्के अधिक फायबर मिळते आणि त्यापासून अर्ध्या संत्र्यापासून मिळेल इतके जीवनसत्व क असते. त्याचबरोबर यातील मॅग्नेशियमचे अधिक प्रमाण आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करते.

(Sperm count : शुक्राणूंची संख्या का कमी होते? जाणून घ्या, आहारात करा हा बदल)

४) नैराश्य दूर करण्यात फायदेशीर

सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीराला फ्रि रॅडिकल्सच्या हानीकारक प्रभावापासून संरक्षण देतात. तसेच हे फळ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याबरोबरच कर्करोग आणि हृदय धमनी रोगाला देखील रोखण्यास मदत करू शकते. सीताफळापासून शरीराला बी कॉम्प्लेक्स विटामिन मिळते जे मेदूतील गाबा (गामा-एमिनोब्यूट्रिक एसिड) न्युरॉन केमिकल लेवलला निंयत्रित करते, जे नैराश्य, ताण आणि आपल्या भावनांना नियंत्रित करण्यात मदत करते. अशा प्रकारे विटामिन बी तुम्हाला शांत राहण्यात मदत करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या