scorecardresearch

Dahi Handi 2022: अशी झाली होती दहीहंडीची सुरुवात; जाणून घ्या महत्त्व व इतिहास

यंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात

Dahi Handi 2022: अशी झाली होती दहीहंडीची सुरुवात; जाणून घ्या महत्त्व व इतिहास
Dahi Handi 2022 significance (फोटो: संग्रहित)

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा मथुरेत जन्म झाला. हा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी यंदा १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी केली जाते. कृष्णाच्या मोहक लीलांपैकी एक म्हणजे गोपाळकाला. मित्रांच्या खांद्यावर उभे राहून गोपिकांच्या घरात दडवून ठेवलेले लोणी खाणारा कृष्ण आजही माखनचोर म्हणून ओळखला जातो. कृष्णाच्या याच लीला आजही दहीहंडी सारख्या उत्सवातून साजऱ्या केल्या जातात. यंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात…

श्रीमद्भागवत गीतेतील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळकृष्ण फारच नटखट होते. स्वतः राजपुत्र असूनही त्यांना गोपिकांच्या घरातील लोणी चोरून खाणे फार आवडायचे. त्यांच्या या नटखट स्वभावामुळे अनेकदा हे गोपगोपिका यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे पण तरी कान्हाने लोणी खाल्ले नाही तर सर्वच जण बेचैन व्हायचे. अनेकदा गोपिका लोणी लपवून एका मडक्यात बांधून ठेवत असे. मग हे बांधून ठेवलेले माठ फोडण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. या लीलांचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो.

Janmashtami 2022 Panchamrut and Sunthavada: कृष्णाचे आवडते पंचामृत आणि सुंठवड्याची पारंपरिक रेसिपी

दहीहंडी मध्ये एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर उभे राहून मानवी थर रचले जातात व एका दोरीला टांगलेले मडके फोडले जाते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला असतो. हाच काला नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.

Krishna Janmashtami 2022 Bhajan: गोकुळाष्टमी विशेष ‘ही’ भजने, गवळणी, व मराठी गाणी ऐकून साजरा करा कृष्ण जन्म

अलीकडे दहीहंडीला व्यावसायिक स्वरूप आले असले तरी त्यामागे खरी भावना ही कृष्णभक्ती आहे. मानवी ठार रचण्यावरून कितीही टीका होत असल्या तरी या माध्यमातून शिस्त व सर्व प्रदर्शन केले जाते असा उद्देश असल्याचे अनेक दहीहंडी संघ सांगतात. महाराष्ट्रात यंदा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. तुम्हाला सुद्धा जन्माष्टमी व दहीहंडीच्या खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या