मधुमेह हा असा एक आजार आहे जो एखाद्या माणसाला जडला की तो कायमचा त्यांच्यासोबत राहतो. मधुमेह हा एक अतिशय धोकादायक आजार आहे ज्यामध्ये इतर अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामध्ये, स्वादुपिंडाद्वारे उत्सर्जित होणारे इन्सुलिन हार्मोन फारच कमी बनते किंवा ते अजिबात बनत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण रक्तात जमा होऊ लागते, त्यामुळे किडनी, हृदय आणि डोळ्यांशी संबंधित आजार होतात. टाइप १ मधुमेहामध्ये इन्सुलिन तयार होत नसल्याने या आजाराने ग्रस्त असलेल्यांना इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. तर या इन्सुलिमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतात का? जाणून घ्या तज्ञांकडून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्सुलिन घेणार्‍यांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो

जामा स्टडीमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इन्सुलिनचे इंजेक्शन घेतल्यानंतर टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा धोका दिसून आला आहे, ही चिंतेची बाब आहे. वास्तविक, अभ्यासात मधुमेही रुग्णांच्या जुन्या नोंदी शोधण्यात आल्या. यात टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाशी संबंधित संबंध शोधले गेले. या अभ्यासात टाइप 1 मधुमेह असलेल्या १३०३ लोकांच्या २८ वर्षांच्या नोंदी घेण्यात आल्या.

( हे ही वाचा: वयाच्या ४५-५० व्या वर्षी रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे? जाणून घ्या चार्ट आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी टिप्स)

या अभ्यासात या रुग्णांना २८ वर्षांच्या कालावधीत कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. तसेच धूम्रपान, मद्यपान, औषधोपचार, कौटुंबिक इतिहास यासारख्या १५० समस्येवर जवळून आढावा घेतला. अभ्यासाचे निष्कर्ष धक्कादायक होते. १३०३ पैकी ९३ रुग्णांवर कर्करोगावर उपचार झाल्याचे या अभ्यासात आढळून आले. याचा अर्थ असा होतो की टाईप 1 रुग्णांपैकी २.८ टक्के रुग्णांना दरवर्षी प्रत्येक १००० मध्ये कर्करोग होते. या ९३ रुग्णांमध्ये ५७ महिला आणि ३७ पुरुष होते. यापैकी ८ लोकांना टाइप १ मधुमेह झाल्यानंतर १० वर्षांच्या आत कर्करोग झाला. यानंतर ११ ते २० वर्षात ३१ जणांना कॅन्सर झाला तर २१ ते २८ वर्षात ५४ जणांना कॅन्सर झाला.

त्यामुळे टाईप 1 मधुमेहाच्या रुग्णांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो असे गृहीत धरावे का? डॉ. अनिकेत मुळ्ये, इंटर्नल मेडिसिन, वोक्हार्ट हॉस्पिटल मीरा रोड सांगतात, गेल्या काही वर्षांत या दोन्ही आजारांचा भार भारतात वाढला आहे. ते म्हणाले की, लठ्ठपणा हे मधुमेह आणि कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. यामुळे आज जगातील बहुतांश लोकांचा मृत्यू होतो. मधुमेह हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे हे खरे असले तरी. यामुळे, मेटोबोलिज्म मध्ये बदल होतो, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या तयार होतात. परंतु अभ्यासानुसार असे सुचवले आहे की इन्सुलिन इंजेक्शन्समुळे कर्करोगाचा धोका वाढतो, हे पूर्णपणे सत्य आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily dose of insulin may increase risk of cancer in type 1 diabetes patients research says but doctor differs gps
First published on: 04-10-2022 at 20:59 IST