निरोगी आयुष्यासाठी आपला आहार खूप महत्वाचा आहे. आहारात प्रोटीनपासून कार्बचा समावेश असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे जीवनसत्व असतात. जर आपण प्रोटीनबद्दल बोलत आहोत तर सगळ्यात जास्त प्रोटीन हे डाळींमध्ये असते. आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आहारात डाळ असणे महत्वाचे आहे.

डाळीत प्रोटीनसोबत, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. एका वयस्कर व्यक्तीने दररोज एक कप डाळीचे सेवन करायला हवे. पण, तुम्हाला माहित आहे की डाळ खाण्याची एक योग्य वेळ असते, आणि डाळ चुकीच्या वेळी खाल्ली तर हे शरीरासाठी हानीकारक असू शकते. याचे उत्तर आयुर्वेदात आहे…

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

१. आपल्या आहारात डाळ असणे महत्वाचे असते. एक कप डाळीचे रोज सेवन केल्याने आपल्या शरीरातील आयरनची कमतरता दूर होते. डाळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

२. डाळ खाल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. डाळ खाल्याने वजन कमी होते आणि कफ आणि पित्तचा त्रास दूर होतो. डाळीचे सेवन केल्याने रक्तही शुद्ध होते. ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

३. भारतात वेगवेगळ्या डाळींचे प्रकार उपलब्ध असतात. प्रत्येक डाळीचे वेगवेगळे गुणधर्म असतात. मसूरची डाळ हलकी आणि लवकर पचते. तर तूरडाळीचे सेवन केल्याने मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग दूर होते.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

४. आता डाळ खाण्याची योग्य वेळ जाणून घेऊया, आयुर्वेदानुसार आहार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची एक वेळ असते, तेव्हाचा त्याचा फायदा होतो.

५. आयुर्वेदानुसार कोणत्याही गोष्टी आपल्याला पटेल तेव्हा खाल्ली तर त्यामुळे शरीरात विषारी तत्व निर्माण होऊ शकतात. यामुळे कफ, पित्त आणि वात होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

६. आयुर्वेदानुसार, डाळ कधी रात्री खाल्ली नाही पाहिजे. रात्री डाळ पचन्यास त्रास होतो. त्यामुळे रात्री डाळीचे सेवन करू नये. परंतु, तुम्ही मसूर डाळ खाऊ शकतात. त्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

७. तूरडाळ, चना डाळ आणि वाटाणा, रात्री या तीनही डाळींचे सेवन करणे टाळा. या डाळ लवकर पचत नाही. यामुळे रात्री या डाळींचे सेवन करू नये.