December Horoscope: डिसेंबरमध्ये ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ; होणार प्रगती!

डिसेंबर २०२१ मध्ये प्रगती देखील मिळेल आणि मोठा आर्थिक लाभ देखील मिळेल. चला जाणून घेऊया डिसेंबर महिन्यासाठी कोणकोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

rashibhavishy
भाग्यशाली राशी (फोटो: Indian Express )

डिसेंबर २०२१ काही राशींसाठी शुभ असेल आणि काहींसाठी अशुभ किंवा सरासरी असेल. या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत. ग्रहांच्या या राशी बदलांचा अनेक राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. ज्योतिषीय गणनेनुसार हा महिना चार राशीच्या लोकांसाठी खूप छान राहील. त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये प्रगती देखील मिळेल आणि मोठा आर्थिक लाभ देखील मिळेल. चला जाणून घेऊया डिसेंबर महिन्यासाठी कोणकोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना छान राहील. कामाच्या ठिकाणी व्यस्तता वाढू शकते. पदोन्नती होऊ शकते. तुम्हाला सन्मान मिळेल. धनलाभ होईल. प्रवासाचीही दाट शक्यता आहे. हा प्रवास कामाशी निगडीत असेल तर नक्कीच फायदेशीर ठरेल.

( हे ही वाचा: वास्तुशास्त्रानुसार मातीच्या ‘या’ तीन गोष्टी ठेवा घरात; चमकू शकते नशीब )

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. चांगले काम केल्यास सर्वांचे कौतुक होईल. आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेले पैसे मिळू शकतात. अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभ राहील. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. बर्याच काळापासून प्रलंबित असलेले पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. एखादी नवीन संधी तुमच्या वाट्याला आली तर ती चुकवू नका. हे भविष्यात खूप फायदेशीर परिणाम देईल. पुरेशी रक्कमही उपलब्ध होईल.

( हे ही वाचा: भारतीय रेल्वे IRCTC च्या ‘या’ सर्व गाड्या जुन्या वेळापत्रकानुसार धावणार; ३०% तिकिटही होणार स्वस्त )

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांना डिसेंबरमध्ये चांगला पैसा मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे पद मिळू शकते. व्यावसायिकांनाही मोठ्या ऑर्डर मिळू शकतात. लाभदायक प्रवास होऊ शकतो. पैसा येण्यासाठी नवीन मार्गही तयार होतील आणि जुने रखडलेले पैसेही उपलब्ध होतील. शक्य असल्यास, काही पैसे गुंतवा.

( हे ही वाचा: मोबाईल नंबर फक्त १० अंकीच का असतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण )

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना पैशांचा पाऊस पाडणारा असेल. अनेक स्त्रोतांकडून पैसे उपलब्ध होतील. नवीन कामे सुरू होतील. जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. सुख-सुविधा वाढू शकतात. हे वर्ष काही चांगल्या बातम्या देऊन जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: December horoscope in december these five zodiac signs will gain money there will be progress ttg

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या