Causes Of Drooling While Sleeping: बऱ्याचदा दिवसभरातल्या कामामुळे तुम्ही अगदी थकून जाता. तेव्हा बेडवर पडलं की लगेचच गाढ झोप लागते. झोप तर गाढ लागते पण कधीकधी उठल्यावर उशीवर लाळेचे डाग दिसतात. अशावेळी तुम्ही घरात असलात किंवा बाहेर असलात तरी खूपच लाजिरवाणे वाटू शकते. हे अनेकजणांसोबत घडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गाढ झोपेदरम्यान लाळ येणे ही काही साधी सवय किंवा योगायोग आहे की तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे. वैद्यकीय भाषेत या समस्येला सियालोरिया असे म्हणतात. झोपेदरम्यान लाळ येणे हे गाढ आणि शांत झोपेचे लक्षण असू शकते. तर दुसरीकडे ते खराब पोश्चरेशन, अॅसिडिटी किंवा सायनसच्या समस्यांचेही लक्षण असू शकते. रात्रीच्या शांततेत आपले शरीर अशा प्रकारे का प्रतिक्रिया देते आणि यामागचे नेमके कारण काय याबाबत जाणून घ्या…
आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
न्यूरोसायन्स विभागाचे प्रमुख डॉ. आत्मप्रीत सिंग यांनी सांगितले की, झोपेच्या वेळी अधूनमधून लाळ येणे सामान्य आहे. हे अनेकदा चेहऱ्याच्या स्नायूंचे सैलपणा, तोंडातून श्वास घेणे किंवा झोपण्याच्या चुकीच्या स्थितीतून उद्भवते आणि सहसा काळजी करण्यासारखे काही कारण नसते. जर ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर सतत नाक बंद होणे, आम्ल, दात किंवा हिरड्यांच्या समस्या किंवा झोपेच्या वेळी गिळताना त्रास होणे अशी लक्षणे असू शकतात. काहीवेळा ते मज्जातंतू किंवा स्नायूंच्या विकारांशी देखील संबंधित असू शकते.
अशावेळी नाक स्वच्छ ठेवावे, योग्य झोप घ्यावी आणि ही समस्या कमी करण्यासाठी कोणत्याही अंतर्निहीत आजारांवर उपचार करावेत. जर लाळ गळत राहिली किंवा ती कायम राहिली तर कारण जाणून घेण्यासाठी आणि पुढील समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोपेत लाळ येण्याची पाच प्रमुख कारणे
मेंदूशी संबंधित विकार
कधीकधी मेंदूच्या काही विकारांमुळे स्नायूंवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे लाळ गळू शकते. या विकारांमध्ये स्ट्रोक, सेरेब्रल पाल्सी, पार्किन्सन, अमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस, मल्टिपल स्क्लेरोसिस, डाउन सिंड्रोम आणि ऑटिझम यांचा समावेश आहे.
संसर्ग
काहीवेळा संसर्गामुळे लाळ गळू शकते. यामध्ये स्ट्रेप थ्रोट किंवा मोनोन्यूक्लिओसिस, सायनस इन्फेक्शन, टॉन्सिलाईटिस आणि पेरिटोन्सिलर अॅब्सेस सारखे संक्रमण होऊ शकते. ही अशी स्थिती आहे जिथे डॉन्सिलाईटिस मान आणि छातीत पसरतो आणि त्यामुळे लाळ येते.
अॅलर्जी
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर झोपताना तुम्हाला लाळ येऊ शकते. खरं तर जेव्हा तुम्हाला अॅलर्जी असते तेव्हा लाळ ग्रंथी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त लाळ निर्माण करतात.
बंद नाक
कधीकधी सर्दी, अॅलर्जी किंवा सायनस संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचे नाक बंद होते. नाक बंद झाल्यामुळे झोपताना लाळ येऊ शकते. या परिस्थितीत तुमचे नाक स्वच्छ ठेवा आणि कोमट पाण्याची वाफ घ्या.
गॅस आणि पित्त
ज्यो लोकांना अॅसिडिटी, गॅस किंवा पित्ताचा त्रास आहे, त्यांना झोपेत लाळ येऊ शकते.
लाळ गळणे कसे थांबवायचे?
- पाठीवर झोपण्याची सवय लावा
- बंद नाकासाठी उपचार करा. झोपण्यापूर्वी स्टीम बाथ घेऊ शकता.
- जास्त पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
- औषधांमुळे लाळ येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दरम्यान, जर लाळ अति प्रमाणात येत असेल आणि श्वास घेण्यास, गिळण्यास त्रास होत असेल किंवा झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
