Ranking Indian Street foods for Fat Loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुमच्या आवडत्या जंक फूडला टाळणे नव्हे. जेव्हा ‘स्ट्रीट फूड’चा खाण्याचा प्रश्न समोर येतो तेव्हा ते पदार्थ कसे बनवले जातात आणि तुम्ही किती प्रमाणात खाता, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. दरम्यान, एका फिटनेस कंटेंट क्रिएटरने लोकप्रिय भारतीय पदार्थांची S-Tier ते F-Tier अशी यादी तयार केली आहे. जर एखाद्या पदार्थाला S-tier म्हटले असेल, तर तो वजन कमी करण्याच्या दृष्टीने तुलनेने चांगला पर्याय मानला आहे. आणि F-tier म्हणजे त्या यादीतील सर्वांत कमी योग्य पर्याय असतो. तर फॅटलॉस कोचने पदार्थातील कॅलरीज, तो तयार करण्याची पद्धत आणि किती वेळ पोट भरलेले राहते, या गोष्टींच्या आधारे त्याने हे रँकिंग केले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ‘फॅट लॉस कोच’ मनप्रीत सिंगने काही ओळखीच्या आणि आवडत्या पदार्थांना आपल्या यादीत आश्चर्यकारकपणे वरचे स्थान दिले. तर छोले-भटुरे आणि कचोरीसारख्या लोकप्रिय, पण ‘हेवी’ (जास्त कॅलरीज असलेल्या) पदार्थांना मात्र सर्वांत खालच्या श्रेणीत ठेवले. नक्की यामागील कारण काय चला जाणून घेऊयात.
इडली-सांबार
इडली-सांबारला सगळ्यात वरचे ‘S-टियर’ स्थान मिळाले आहे. इडली हा कमी कॅलरीज असलेला पदार्थ असून, आंबवलेल्या पिठापासून तयार केला जातो. एका इडलीमध्ये साधारण १०० ते १२० कॅलरीज असतात. कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
मोमोज
वाफेवर शिजवलेल्या मोमोजलाही ‘S-टियर’ रेटिंग मिळाले आहे. कारण – वाफेवर शिजविल्यामुळे त्यांना तळण्याची गरज नसते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज टाळता येतात. फक्त मोमोजच्या सारणाकडे (फिलिंगकडे) लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी चिकन किंवा पनीरचे मोमोज निवडून साधारण पाच ते सहा मोमोज खाण्याची शिफारस केली जाते.
पाणीपुरी
वजन कमी करताना टाळावयाच्या पदार्थांमध्ये पाणीपुरीचा सहज समावेश केला जातो. पण, पाणीपुरीसुद्धा कमी कॅलरीज असलेला पदार्थ आहे. त्यातील मसालेदार पाणी काही काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे हे रँकिंग अनेकांचे लक्ष वेधून घेईल एवढं तर नक्कीच.
समोसा आणि बटाटा-कचोरी (aloo tikki chaat)
या दोन्ही पदार्थांना ‘C-टियर’मध्ये स्थान देण्यात आले आहे. एका समोशामध्ये सहजपणे ३०० कॅलरीज असू शकतात. पण, बटाटा-कचोरीपेक्षा सामोसा चांगला पर्याय मानतो. तसेच, त्यातील बटाट्याचे सारण (फिलिंग) पोट भरण्यास मदत करते. दरम्यान, बटाटा कचोरीला ‘C-टियर’ रेटिंग मिळते. कारण – ही तेलात तळलेली असते. चरबी कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
छोले भटुरे आणि बटाटा-कचोरी
या क्रमवारीत सर्वांत शेवटी छोले भटुरे आणि आलू कचोरी यांना स्थान देण्यात आले आहे. छोले भटुरेच्या एका सर्व्हिंगमध्ये १,००० पेक्षा जास्त कॅलरीज असू शकतात. हे पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. तसेच बटाटा कचोरीचाही समावेश ‘F-टियर’मध्ये करण्यात आला आहे. कचोरी तेलात तळलेली असल्यामुळे त्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. अंदाजानुसार, भाजीचा विचार न करता, एका आलू कचोरीमध्ये सुमारे ३०० ते ४०० कॅलरीज असू शकतात.
या व्हिडीओच्या माध्यमातून वजन किंवा शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताना स्ट्रीट फूड पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याकडे योग्य पद्धतीने खाण्याचा सल्ला दिला आहे. एखादा पदार्थ फक्त ‘आरोग्यदायी’ किंवा ‘आरोग्यासाठी हानिकारक’ आहे, असे ठरवण्याऐवजी तो कसा बनवला आहे, त्यातील कॅलरीज किती आहेत आणि आपण तो किती प्रमाणात खातो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
