Fight Diseases With Powerful Fruits : पचनाच्या समस्या आपल्यावर शांतपणे पण मोठा प्रभाव टाकत असतात. जसे की, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, सैल शौच किंवा पोटाचा अस्वस्थपणा, हे आपल्या ऊर्जा, मनःस्थिती आणि झोपेसुद्धा प्रभावित करू शकतात. बाजारात अनेक सप्लिमेंट्स आणि झटपट उपाय या सगळ्या समस्यांवर उपलब्ध आहेत. पण खरं तर काही प्रभावी उपाय तुमच्या फळांमध्ये दडलेले असतात. अलीकडच्या , पोषणतज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी सांगितले की, काही विशिष्ट फळे पचनासंबंधी विशिष्ट समस्यांसाठी कशी मदत करतात हे व्हिडीओद्वारे सांगितले आहे. कोणताही अतिरेक किंवा जाहिरात नाही, फक्त सोपी आणि वैज्ञानिक माहिती.

पपई – जर पोटफुगी ही तुमची नेहमीची समस्या असेल. तर पपई तुम्ही आवर्जून खाल्ला पाहिजे. पपईमध्ये पपेन भरपूर प्रमाणात असते; जे एक पाचक एंजाइम म्हणून काम करते; यामुळे प्रथिने तोडण्यास मदत होऊन पोटफुगी कमी होते. पपेन पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते, विशेषतः जड किंवा प्रथिनेयुक्त जेवणानंतर. म्हणूनच पपई बहुतेकदा रिकाम्या पोटी खाण्यापेक्षा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर खाण्याची शिफारस केली जाते. पोटफुगी, जेवणानंतर जडपणा जाणवत असेल तर ताजी, पिकलेली पपई खावी. फक्त खूप जड पदार्थांसोबत खाणे टाळा.

पेर – बद्धकोष्ठता आणि आळशी आतड्यांसाठी तुम्ही पेर खाल्ले पाहिजे. तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास तुमच्यात शरीरात फायबर आणि द्रवपदार्थाची कमतरता असते. त्यामुळे पेर दोन्ही समस्या सोडवते. पेरमध्ये नैसर्गिकरित्या सॉर्बिटॉलचे प्रमाण जास्त असते. सॉर्बिटॉल एक सौम्य, नैसर्गिक लॅक्सेटिव्ह (मऊ शौचासाठी मदत ) सारखं काम करतं. हे आतडे हलकं आणि नैसर्गिकरीत्या कार्यरत ठेवतं, त्यामुळे कोणतेही कठोर किंवा हानीकारक परिणाम होत नाहीत. तुम्हाला बद्धकोष्ठता असेल किंवा मल कडक बाहेर येत असेल तर सालीसह पूर्ण एक पेर चावून व्यवस्थित खा.

केळी – पचन उलटद्या दिशेने जाऊ लागलं, म्हणजे सैल शौच (जुलाब) होत असतील, तेव्हा केळी मदत करतात आणि पोटाला स्थिर करतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात; जे शौच घट्ट करण्यास मदत करतात आणि पोटातील संतुलन पुन्हा साधतात. तसेच केळी हलके पचतात, त्यामुळे पोटात जळजळ होत असेल असेल किंवा पोट सुजलेलं असेल तर खाण्यास योग्य असतात. अतिसार, निर्जलीकरण या समस्यांसाठी पिकलेलं केळ खा आणि आम्लपित्त (ऍसिडिटी) होण्याची शक्यता असल्यास जास्त पिकलेली केळी खाऊ नका.

अननस – आयबीएस (IBS) संबंधित पचनाच्या त्रासासाठी अननस बेस्ट आहे. आयबीएस मध्ये पचनाशी संबंधित त्रास म्हणजे फक्त एक लक्षण नसून, पोटातील सूज आणि संवेदनशीलता ही मुख्य समस्या असते. अननसात ब्रॉमेलिन (Bromelain) नावाचं एन्झाइम असतं; जे सूज कमी करण्यास आणि अन्न पचवण्यास मदत करतात. हे आयबीएस असलेल्या लोकांसाठी उपयोगी ठरू शकतं. IBS मुळे पोट फुगणे आणि अस्वस्थया जाणवत असेल तर ताजे आणि छोटे भाग अननसाचे खायला सुरुवात करा.

सफरचंद – दीर्घकालीन पचनासाठी हे फळ सगळ्यात चांगले आहे. जर तात्पुरता आराम नको असेल तर रोज सफरचंद खायला सुरुवात करा. सफरचंदात प्रिबायोटिक (Prebiotic) प्रभाव असतो; जो पोटातील बॅक्टेरियाला अन्न पुरवतात आणि पचनासाठी निरोगी मायक्रोबायोमला मदत करतात. त्यामुळे संपूर्ण निरोगी पचनसंस्था फक्त पचनासाठीच नाही. तर रोगप्रतिकारक शक्ती (immunity), मेटाबॉलिझम, आणि मनाच्या स्थितीच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. पचनासाठी आणि दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी सालसहित, सकाळी मधल्या वेळी किंवा संध्याकाळी लवकर सफरचंद खाणे फायदेशीर ठरेल.