scorecardresearch

प्लास्टिक खुर्चीवर काळे डाग पडलेत? एकदा करा हे घरगुती उपाय; नव्यासारखी चमकेल खुर्ची

अनेकदा घरच्या खुर्च्यांकडे दुर्लक्ष करतो. काही दिवसांनंतर त्यावर काळे डाग पडतात. मग हे काळे डाग कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण होतो; पण टेन्शन घेऊ नका. आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत; ज्यामुळे तुमची खुर्ची नव्यासारखी चमकू शकते.

home remedies cleaning tips
Desi Jugaad : प्लास्टिक खुर्चीवर काळे डाग पडलेत? एकदा करा हे घरगुती उपाय; नव्यासारखी चमकेल खुर्ची (Photo : Loksatta)

Desi Jugaad : खुर्ची ही अशी वस्तू आहे; जी प्रत्येकाच्या घरी असते. सध्या लाकडी खुर्चीपेक्षा प्लास्टिक खुर्ची लोक आवडीने घेतात. घर स्वच्छ करताना आपण अनेकदा घरच्या खुर्च्यांकडे दुर्लक्ष करतो. काही दिवसांनंतर त्यावर काळे डाग पडतात. मग हे काळे डाग कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण होतो; पण टेन्शन घेऊ नका. आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत; ज्यामुळे तुमची खुर्ची नव्यासारखी चमकू शकते.

व्हिनेगर व डिटर्जंट पावडर

खुर्चीवर जर काळे डाग पडले असतील, तर चुकूनही स्क्रबरने घासू नका. स्क्रबरने घासल्यामुळे खुर्ची खराब होऊ शकते. व्हिनेगर व डिटर्जंट पावडरचा उपयोग करून तुम्ही खुर्ची स्वच्छ करू शकता. व्हिनेगर व डिटर्जंट पावडरचे मिश्रण खुर्चीवर टाका आणि टूथब्रशने घासा.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

हेही वाचा : तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय आहे? आताच थांबवा; जाणून घ्या एकदा हे दुष्परिणाम….

बेकिंग सोडा

बेकिंग पावडरच्या मदतीने तुम्ही जुनी खुर्ची नव्यासारखी चमकवू शकता. एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात एक-दोन चमचे बेकिंग पावडर आणि लिंबूचा रस टाका. हे मिश्रण खुर्चीवर टाका आणि टूथब्रशने घासा. थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने खुर्ची धुऊन घ्या.

शॅम्पू

खुर्ची स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू हा खूप चांगला पर्याय आहे. शॅम्पूच्या मदतीने तुम्ही खुर्ची चांगल्या रीतीने स्वच्छ करू शकता; पण प्रत्येक वेळी शॅम्पूने खुर्ची स्वच्छ करणे परवडणार नाही. त्यामुळे स्वच्छतेसाठी नेहमी मुदत संपलेला शॅम्पू वापरावा.

प्लास्टिक खुर्ची जर तुम्हाला वर्षानुवर्षे नवी राहायला हवी असेल, तर लक्षात ठेवा की, खुर्ची कधीही जास्त उन्हात ठेवू नका आणि पाण्यापासूनही ती दूर ठेवा. महिन्यातून दोनदा प्लास्टिक खुर्ची आवर्जून स्वच्छ करा. त्याशिवाय खुर्चीला कव्हर लावा. त्यामुळे खुर्ची लवकर खराब होणार नाही.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi jugaad how to clean dirty plastic chair at home try home remedies cleaning tips ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×