आपल्याला व्यग्र जीवनामुळे स्वतःच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर अजिबात लक्ष देता येत नाही. अनेकांना सतत वाढणारे वजन कमी करण्यासाठी व आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही. याकरिता या परिस्थितीत तुम्ही डेटॉक्स ड्रिंक्स घेण्यास सुरुवात करा. कारण डेटॉक्स ड्रिंक्स तुमच्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात. डिटॉक्स ड्रिंक्स केवळ तुमच्या शरीराला हायड्रेट करत नाही. तर शरीरातील वाढते विषारी पदार्थ कमी करण्यास देखील मदत करते. तुम्ही या डिटॉक्स ड्रिंक्सचे नियमित सेवन केल्यास याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो,म्हणजेच त्वचा निरोगी दिसू लागते, पचन प्रणाली योग्यरित्या कार्य करते आणि वजन देखील वेगाने कमी होण्यास मदत होते.

तुम्ही आता विचार करत असाल की डिटॉक्स ड्रिंक्स नेमकी काय आहे? तर हेल्थलाईनच्या मते, डिटॉक्स ड्रिंक्स हे खरं तर फळं, हिरव्या भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून तयार केलेले विशेष पेय आहेत. ज्याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील घातक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करते. या डिटॉक्स ड्रिंक्सला काहीजण फ्रूट फ्लेवर ड्रिंक्स देखील म्हणतात. कोणत्याही ज्यूसच्या तुलनेत त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. हे मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात कसे बनवायचे डिटॉक्स ड्रिंक्स.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

– सफरचंद आणि दालचिनी डिटॉक्स ड्रिंक्स

आता सफरचंद आणि दालचिनी डिटॉक्स ड्रिंक्स बनवण्यासाठी सफरचंदाचे कापलेले काही काप आणि त्यात दालचिनीचे तुकडे हे अर्धा लीटर पाण्यात मिसळवा. यात चवीसाठी लिंबाचा रस टाका आणि चार तास फ्रीज मध्ये ठेवा. यानंतर हे ड्रिंक्स तयार आहे. तुम्ही हे सफरचंद आणि दालचिनीचे डिटॉक्स ड्रिंक्स सकाळी उठल्यावर काही न खाता- पिता घ्यावे. यांच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल. सफरचंद डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने किडनी साफ राहाते आणि किडनीचे कार्यही निरोगी राहते. दालचिनी शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीराला सक्षम बनते.

– संत्रे आणि आल्याचे डिटॉक्स ड्रिंक्स

एक संत्र घ्या. या संत्र्याचे लहान बारीक काप करा. आल्याचा बारीक तुकडा घेऊन तो बारीक किसून घ्या. यानंतर अर्धा लीटर पाण्यात संत्र आणि किसलेले आले चांगले मिक्स करा. व चवीकरिता तुम्ही त्यात लिंबाचा रस टाका. हे मिश्रण तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवा. संत्र आणि आल्याचे डिटॉक्स ड्रिंक्स याचे रोजाना सेवन केल्याने वजन कमी होईल आणि त्वचा चांगली निरोगी होईल.

– काकडी आणि लिंबाचे डिटॉक्स ड्रिंक्स

काकडीचे काही काप कापून ते अर्धा लीटर थंड किंवा नॉर्मल टेंपरेचर पाण्यात टाका. चवीनुसार काळे मीठ, लिंबाचे काप किंवा लिंबाचा रस घालून ते फ्रिजमध्ये चार तास ठेवा. चार तासांनंतर बाहेर काढा. हे डिटॉक्स ड्रिंक्स तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही त्यात पुदिन्याची ६-७ पाने टाकून त्याची चव वाढवू शकता आणि ते तुम्ही दिवसभरात कधीही शकता.

(टीप :-  वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)