धनत्रयोदशीच्या दिवशी या ५ वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं; ज्योतिष शास्त्रानुसार धनलाभ होऊ शकतो

दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. ज्योतिष शास्त्रानुसार, अशा ५ गोष्टी आहेत, ज्या विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

dhanteras-1-1

दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. यंदा धनत्रयोदशीचा सण २ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. या दिवशी लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने, चांदी, भांडी आणि वाहन खरेदी करणे तसेच संपत्ती इत्यादीमध्ये गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, अशा ५ गोष्टी आहेत, ज्या विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

कुंकू :धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू नक्कीच खरेदी करावं. कुंकू खरेदी केल्यानंतर ते देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ते स्वतःला लावा, असं मानलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

आई लक्ष्मीच्या पावलांचे ठसे : धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे आई लक्ष्मी खूप प्रसन्न होते. पण लक्षात ठेवा की लक्ष्मीच्या पाऊलखुणा ठेवण्यापूर्वी त्यांची आरती करा. तसंच आई लक्ष्मीला घरात वास करण्याची प्रार्थना करा.

दीप : दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशीही दिवे लावले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे खरेदी करण्याची परंपरा आहे. रात्री झोपण्यापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावल्याने अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळते.

धने: धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धने खरेदी करा आणि देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या चरणी अर्पण करा. यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीसमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. नंतर हे धने प्रसादाच्या रूपात सर्व लोकांमध्ये वाटून घ्या. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. तुमच्या घरात जर धाण्याचं झाडं असेल तर ते शुभ मानलं जातं. तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं. हवं असल्यास तुम्ही धणे पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता.

बत्तासे : धनत्रयोदशीच्या दिवशी बत्तासे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. त्यानंतर हे बत्ताशे देवी लक्ष्मीला अर्पण करा. हा उपाय केल्याने घरात कधीही आर्थिक समस्या येत नाही.

धनत्रयोदशीच्या दिवशी हे उपाय केल्याने आई लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhanteras 2021 buy these things on dhanteras for money maa lakshami diwali 2021 what to buy on dhanteras prp