Diabetes and supplements : मधुमेह या आजारावर नियंत्रण आवश्यक आहे. कारण – यादरम्यान रुग्णांची प्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत होते, ज्यामुळे संसर्ग आणि इतर आजारांचा धोका सुद्धा वाढतो. रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी अनेक जण सप्लिमेंट्स घेतात. (सप्लिमेंट्स म्हणजे आहारपूरक गोळ्या किंवा पावडर, ज्या शरीरात एखाद्या पोषक घटकाची कमतरता भरून काढण्यासाठी घेतल्या जातात). त्यांना वाटते की, गोळ्या किंवा पावडरचे सेवन केल्याने पौष्टिकतेची कमतरता भरून निघेल. पण, तज्ज्ञ सल्ला देतात की, मधुमेही रुग्णांनी आहार घेताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण- काही वेळेला रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो किंवा काही हर्बल किंवा नैसर्गिक वाटणाऱ्या गोळ्यांचे साइड इफेक्ट्स वाढू शकतात.

कॅलिफोर्निया येथील रजिस्टर्ड डाएटिशियन आणि सर्टिफाइड डायबिटीज केअर अँड एज्युकेशन स्पेशलिस्टच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी काही लोकांना गोळ्या किंवा पावडर घेण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. न्यूयॉर्क येथील प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डाएटिशियन Michelle Routhenstein (EntirelyNourished.com) आणि कोलोरॅडो येथील रजिस्टर्ड डाएटिशियन Jordan Hill (Top Nutrition Coaching) यांनीही मधुमेही रुग्णांना काही सप्लिमेंट्सबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सप्लीमेंट्स म्हणजे काय?

सप्लिमेंट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, औषधी वनस्पती, अमिनो आम्ल, प्रो-बायोटिक्स यांचा समावेश होतो. पौष्टिकतेची कमतरता भरून काढण्यासाठी आणि एकूणच निरोगी राहण्याला आधार देण्यासाठी या सप्लिमेंट्समध्ये तयार केलेल्या असतात. खनिज आणि जीवनसत्त्वेयांनी युक्त असलेला काही पूरक आहार रोगप्रतिकारक शक्ती, स्नायू पुनर्प्राप्ती, हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पण, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय मिळणारे औषधे बाजारात येण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाते आणि त्यांना मंजुरी दिली जाते.

मधुमेहाच्या रुग्णांचे नुकसान करणारे सप्लिमेंट्स कोणते?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, काही आहारपूरक गोळ्या किंवा पावडर मधुमेह असलेल्या लोकांसाठी गंभीर आरोग्य धोके निर्माण करू शकतात. अमेरिकन डायबिटीज स्टँडर्ड्स ऑफ केअरनुसार, जर प्रत्यक्षात पोषक तत्त्वांची कमतरता नसेल, तर मधुमेह असलेल्या लोकांना हर्बल किंवा नॉन-हर्बल सप्लिमेंट्स घेण्याचा कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही. अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजीचे जॉर्डन हिलने म्हणतात, सर्व अनियंत्रित पौष्टिक सप्लिमेंट्स वापरताना सावधगिरी बाळगण्याची शिफारस केली जाते आणि रचना, गुणवत्तेतील विसंगती आणि हानीची शक्यता अधोरेखित करते. रक्तातील साखरेची पातळी, औषधे किंवा मधुमेह व्यवस्थापनावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञ सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस करतात.

क्रोमियम – क्रोमियम हे शरीराला खूप कमी प्रमाणात आवश्यक असलेले एक ट्रेस मिनरल्स (खनिज) आहे. संपूर्ण धान्य, ब्रोकोली, काजू, मसूर, मांस व अंडी यापदार्थांमध्ये खनिज आढळते आणि चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावते. टाईप २ मधुमेहात रक्तातील साखरेचे नियमन सुधारण्यासाठी याचे सेवन केले जाते. पण, याला समर्थन देणारे संशोधन मर्यादित आहे. इन्सुलिन किंवा तोंडावाटे घेतलेल्या मधुमेहाच्या औषधांबरोबर घेतल्यास हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेचे प्रमाण कमी) होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे चक्कर किंवा थकवा येऊ शकतो.

कारलं – कारलं ही रक्तातील साखर कमी करण्यासाठी म्हणून खाल्ली जाते. त्यात पॉलीपेप्टाइड-पी नावाची संयुगं असतात, जी इन्सुलिनसारखी काम करू शकतात. रक्तातील साखर पेशींमध्ये जाण्यास मदत करू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाच्या औषधांबरोबर कारलं खाल्ल्यानं रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते आणि हायपोग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो.

व्हिटॅमिन बी३ – कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनासाठी याचा वापर केला जातो; पण त्यामुळे मधुमेहींमध्ये रक्तातील साखर वाढू शकते आणि हायपरग्लायसेमियाचा धोका वाढू शकतो. मिशेल राउथेनस्टाईन असा सावधगिरीचा इशारा देतात की, A1c (HbA1c) ही चाचणी गेल्या २ ते ३ महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दाखवते. जर व्हिटॅमिन बी३ डोसचे प्रमाण जास्त असेल, तर A1c नियंत्रित ठेवणे कठीण होऊ शकते. एनआयएचच्या माहितीनुसार, फक्त मधुमेह असलेल्या लोकांनाच नाही. ज्यांना मधुमेह नाही, अशा लोकांमध्येही काही पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते.

जिनसेंग – आशियाई जिनसेंग ही एक औषधी वनस्पस्ती आहे, जी ऊर्जा, लक्ष केंद्रित करणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. त्यात अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात. जर तुम्ही डायबिटीजची औषधे जिनसेंगसोबत घेतल्यास ब्लड शुगर खूपच कमी (हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका) होऊ शकते.

बीटा-कॅरोटीन – हे सप्लिमेंट अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन एचा स्रोत म्हणून घेतले जाते. जॉर्डन हिलच्या मते, अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) मधुमेह असलेल्या लोकांना बीटा-कॅरोटीन सप्लिमेंट्स टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण- त्यामुळे बीटा-कॅरोटीन सप्लिमेंटचा संबंध फुप्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकारामुळे मृत्यू होण्याच्या धोक्याशी संबंधित आहे.

दालचिनी (कॅसिया दालचिनी) – दालचिनी रक्तातील साखर कमी करण्यासाठी, इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यासाठी एक लोकप्रिय सप्लिमेंट आहे. पण, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते. त्याशिवाय, त्यात कौमरिन नावाचे संयुग असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते.

कोरफड – मधुमेह, वजन कमी होणे, आतड्यांसंबंधी रोगांसाठी लोकप्रिय सप्लिमेंट आहे. पण, मधुमेहाच्या औषधांबरोबर घेतल्यास रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते. त्यामुळे जठररोगविषयक दुष्परिणामदेखील होऊ शकतात.

मधुमेही रुग्णांनी कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी आणि औषधे याबाबत त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही.