Diabetes Control: मधुमेह नियंत्रणात ठेवायचं तर रोज ‘हा’ चहा घ्या; जाणून घ्या फायदे व रेसिपी

आज आपण डायबिटीज वर एक नैसर्गिक उपाय म्हणून सगळ्यांची आवडती रेसिपी पाहणार आहोत..

Diabetes Control: मधुमेह नियंत्रणात ठेवायचं तर रोज ‘हा’ चहा घ्या; जाणून घ्या फायदे व रेसिपी
डायबिटीज नियंत्रणात ठेवणारा चहा (फोटो: Pixabay)

Diabetes Control Ayurvedic Remedies: आजकाल लहानांपासून वृद्धांपर्यंत मधुमेहाची लागण कोणालाही होऊ शकते. अनियोजित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह व त्याला जोडून येणाऱ्या आजारांची सुरुवात होते. मधुमेहाचे परिणाम व त्यावरील उपचार हे त्याच्या प्रकाराप्रमाणे बदलत असतात. जसे की, टाईप १ च्या डायबिटीज मध्ये स्वादुपिंड इन्सुलिन बनवणे बंद करते तर टाईप २ च्या मधुमेहात इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. इन्सुलिन कमी झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि परिणामी मधुमेह बळावण्याचा धोका असतो. यावर आज आपण एक नैसर्गिक उपाय म्हणून एक सगळ्यांची आवडती रेसिपी पाहणार आहोत..

डायबिटीज वर आयुर्वेदिक उपचार घेत असल्यास आपल्याला ठाऊक असेल की रक्तातील साखर कमी करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत परिणामकारी औषध मानले जाते. जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. रोज सकाळी अनसे पोटी ४ ते ५ जास्वंदाच्या फुलांचे सेवन केल्यास मधुमेह तर नियंत्रणात राहतोच मात्र अपचन, बद्धकोष्ठता, त्वचा विकार सुद्धा कमी होतात.

जास्वंदाच्या फुलाचे सेवन कसे कराल?

  • आपण पाकळ्या धुवून कच्च्या सुद्धा खाऊ शकता किंवा जास्वंदीच्या फुलांचा चहा सुद्धा करून रोज सकाळी सेवन करू शकता.
  • जास्वंदीच्या चहाची रेसिपी सुद्धा अगदी सोपी आहे. आपण जास्वंदाची सुकी फुले मिक्सर मध्ये वाटून त्याची पूड करून ठेवा. रोज ज्या पद्धतीने आपण चहा करतो त्याच पद्धतीने आपण गरम पाण्यात ही पूड टाकून उकळून पिऊ शकता. चवीसाठी या चहामध्ये लिंबू पिळून घ्या. या चहामध्ये दूध व साखर न टाकता सुद्धा चव एकदम रिफ्रेशिंग होते.
  • जास्वंदाच्या पाकळ्यांप्रमाणे पानांमध्येही औषधी गुण आहेत त्यामुळे या पानांचे सेवन सुद्धा कच्चे करा.

Green Tomato Pickle: डोळे दुखणे, रक्तदाब यावर रामबाण उपाय आहे ‘हे’ लोणचं; घरीच करून पहा रेसिपी

जास्वंदाच्या सेवनाचे फायदे:

  • जास्वंदातील अँटिऑक्सिडंटमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते परिणामी रक्तातील साखर व अन्य अपायकारक घटक सुद्धा कमी होतात.
  • उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्वंदाचा उपयोग होतो.
  • जर तुम्हाला पायाला सूज येण्याचा त्रास असेल तर जास्वंदातील अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे तुम्हाला नक्की आराम मिळू शकतो.
  • वजन व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्वंदाचा फायदा होतो.

मधुमेहावर तुम्ही औषध गोळ्या इंजेक्शन घेऊन नियंत्रण ठेवू शकतो पण औषधांमुळे ऍसिडिटी सारखे त्रासही डोकं वर काढतात. त्यामुळे दीर्घकाळ आराम मिळण्यासाठी जास्वंदाच्या या हर्बल टीचे नक्की सेवन करून पहा.

(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gauri Ganpati 2022: यंदा गणपतीत ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी