Diabetes control low glycemic fruits : आजकाल मधुमेह खूप सामान्य झाला आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना त्याचा त्रास होत आहे. ही एक सामान्य समस्या आहे; पण त्याचा अर्थ ती समस्या धोकादायक नाही, असा होत नाही. कारण- केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही वाढत्या मृत्युदराचे मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा तुम्हाला मधुमेह असतो, तेव्हा काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे एक मोठे आव्हान असते. कारण- एक चूक तुमच्या साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढवू शकते, ज्यामुळे इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. या लेखात, आपण अशा काही फळांबद्दल जाणून घेऊया, जी तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
मधुमेह किती धोकादायक?
मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी कमी होणे, नसांचे नुकसान आणि पायाला अल्सर होण्याचा धोका वाढू शकतो. प्रश्न असा निर्माण होतो की, हा गंभीर आजार शरीरात कसा विकसित होतो? जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जेव्हा शरीर कमी इन्सुलिन तयार करते किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाही आणि मग त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेह होतो. जास्त साखर खाणे, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, असंतुलित आहार आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास यांमुळे धोका वाढू शकतो.
मधुमेही फळे खाऊ शकत नाहीत का?
मधुमेहाच्या रुग्णांना काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल सतत संभ्रम असतो. लोकांना अनेकदा असे वाटते की, फळे खाणे टाळावे. कारण- त्यामुळे मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. तथापि, सत्य हे आहे की, सर्वच फळे रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाहीत. तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल, पण काही फळे ‘लो-ग्लायसेमिक’ असतात म्हणजेच ती रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाहीत, आणि ती चवीलाही चांगली असून आरोग्यासाठी फायदेशीरही असतात.
कोणती ५ फळे आरोग्यासाठी फायदेशीर?
अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या मते , कमी ग्लायसेमिक पदार्थ, ज्यामुळे साखरेच्या पातळीत अचानक वाढ होत नाही, त्यांमध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो:
- सफरचंद
- केळे
- संत्र
- किवी
- पपई
ग्लायसेमिक लोड (GL) हे मोजते की, कर्बोदकयुक्त अन्नपदार्थांचे विशिष्ट प्रमाण तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढवते. ज्या फळांचा GL १० पेक्षा कमी असतो, ती मधुमेहींसाठी फायदेशीर मानली जातात. त्यामुळे प्रत्येक फळ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असते, ??? असे समजू नका. (की- असे मधुमेहींनी समजू नये.)??? तथापि, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांचे नियमित सेवन करणे महत्त्वाचे आहे. कारण- प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते.
