scorecardresearch

ब्लड शुगर लेवल नियंत्रीत ठेवू शकतं वांगं; जाणून घ्या सविस्तर

आरोग्य विशेषतज्ज्ञ मधुमेहग्रस्तांना खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. तुमच्या आहारात वांगं समाविष्ट केल्यामुळे ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत होते.

brinjal-benefits-for-BLOOD-SUGAR

सध्याच्या काळात चुकीच्या पद्धतीचं खानपान आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांचं शरीर हे वेगवेगळ्या आजाराचं घर बनलंय. रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तात सारखेची पातळी वाढल्याने हार्ट अटॅक, किडनी फेलियर आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा देखील धोका असतो.

आरोग्य विशेषतज्ज्ञ मधुमेहग्रस्तांना खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. आपण जे जे अन्न खातो त्याचा परिणाम शरीरातल्या ग्लूकोजवर होत असतो. औषधोपचारसोबतच काही घरगुती उपायांनी ब्लड शुगर लेवल नियंत्रीत ठेवू शकता येतं. मधुमेहग्रस्तांना त्यांच्या आहारात वांगं समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो. वांग्यामुळे शरीरातली ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

वांग्याचे फायदे: प्रत्येकांच्याच स्वयंपाकघरात वांगं सहज उपलब्ध होत असतं. पण याचा उपयोग तुमच्या आरोग्यासाठीही होतो. वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. यात कॅलरी सुद्धा कमी प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे यात पॉलीफेनोल नावाचं नॅचरल प्लांट कंपाउंड असतं. यामुळे ग्लूकोज शोषून घेऊन शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवतं.

अशा प्रकारे डाएटमध्ये समाविष्ट करा

मधुमेहाने त्रस्त असलेल्या रूग्णांनी त्यांच्या आहारात वांगं समाविष्ट करू शकतात. तुम्हाला हवं असल्यास भाजीच्या स्वरूपात किंवा मग ज्यूसच्या रूपात याचं सेवन करू शकतात. वांग्यामुळे फक्त मधुमेह रोग्यांसाठी उपयुक्त नाही तर सोबत ते ह्रदयाच्या उत्तम आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. वांग्यामुळे आपली पचनशक्ती उत्तम राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2021 at 21:03 IST
ताज्या बातम्या