scorecardresearch

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या

मधुमेह असणाऱ्यांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते, यामुळे त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण व्यायाम करताना त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या
(Photo : Freepik)

भारतासह जगभरात मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. बदललेली जीवनशैली, तणाव, पूरेसा व्यायाम न करणे यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढली आहे. एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे निदान झाले, तर त्या व्यक्तीच्या तब्बेतीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ‘द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’नुसार आठवड्यातून २ दिवस १५० मिनिटं एरोबिक एक्सरसाइज करणे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहाचे रुग्ण व्यायाम सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी सर्वात आधी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपले शरीर प्रत्येक गोष्टीसाठी तयार असतेच असे नाही, त्यात व्यायाम करण्यासाठी शरीर अधिक मजबूत असण्याची गरज असते. अशाप्रकारे तज्ञांच्या सल्ल्यानुसार मधुमेह असणाऱ्या व्यक्ती फिट राहण्यासाठी काही व्यायाम करू शकतात. व्यायाम करताना मधुमेह रुग्णांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.

Weight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल

मधुमेह रुग्णांनी व्यायाम करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • व्यायाम सुरू करण्याच्या आधी आणि नंतर रक्तातील साखरेची पातळी तपासा. टाईप एक आणि दोन या दोन्ही प्रकारामधील मधूमेह असणाऱ्यांची ब्लड शुगर व्यायाम करण्याआधी २५० एमजी/डीएल असावी.
  • मधुमेह असणाऱ्यांना सतत तहान लागत असते. त्यामुळे व्यायाम करताना त्यांना डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी व्यायाम सुरू करण्याच्या आधी आणि नंतर पाणी प्या.
  • व्यायाम करत असताना ब्लड शुगर लो होण्याची शक्यता असते. यासाठी ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ज्युस तुमच्याबरोबर ठेऊ शकता आणि गरज लागल्यास ते घेऊ शकता.
  • अति थंड किंवा अति उष्ण तापमानात व्यायाम करणे टाळा.
  • ‘मेडिकल अलर्ट आयडी बँड’चा वापर करा ज्यामुळे तुम्हाला व्यायाम केल्याने शरीरावर काय परिणाम होत आहे याचा अंदाज येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या