scorecardresearch

डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही करू नका ‘या’ ३ गोष्टींचे सेवन; Blood Sugar झपाट्याने वाढू शकते

Diabetes Control Tips: डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात काही पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

blood sugar foods
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Diabetes Control Tips: मधुमेह हा आजार आता सामान्य होत चालला आहे. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये शरीरातील स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे याला मधुमेहाचा आजार म्हणतात. इन्सुलिनबद्दल बोलायचे तर, हा एक प्रकारचा हार्मोन आहे जो पाचक ग्रंथीद्वारे तयार केला जातो. या संप्रेरकाचे काम अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे आहे. मधुमेही रुग्णांना दिवसभर रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर सकाळच्या नाश्त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सकाळच्या नाश्त्यात काही पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होते.

अनेकदा मधुमेही रुग्णांची फास्टिंग शुगर जास्त राहते, अशा स्थितीत जर नाश्त्यात कमी फायबर आणि जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्याची विशेष काळजी घ्यावी.

अपोलो हॉस्पिटल नोएडा येथील सल्लागार मधुमेह थायरॉईड संप्रेरक विशेषज्ञ डॉ. बी.के. राय यांच्या मते, मधुमेही रुग्ण आहारात बदल करून देखील मधुमेह रिवर्स करू शकतात. काही पदार्थांचा मधुमेहाच्या रुग्णांवर झपाट्याने परिणाम होतो, त्यामुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत जेणेकरून दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

गहू आणि बटाटे खाणे टाळा

७० पेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कोणतेही अन्न मधुमेहासाठी धोकादायक आहे. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५८ ते १११ दरम्यान आहे. अशा पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. अनेकदा लोक नाश्त्यात बटाट्याचा पराठा किंवा बटाट्याचा भुजिया खातात. गव्हाच्या पिठापासून बनवलेला आलू पराठा रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो. गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट असतात आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात गहू आणि बटाटे खाणे पूर्णपणे टाळावे.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब युरिक ॲसिड सहज बाहेर पडेल? फक्त पाणी पिण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या)

फळांचे रस पिणे टाळा

फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फळांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचन मंदावते आणि शरीरातील ग्लुकोजचे शोषण कमी करते, त्यामुळे साखरेची पातळी वेगाने वाढत नाही, परंतु जर तुम्ही फळांचा रस पीत असाल तर ते तुमच्या रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते. सकाळच्या नाश्त्यात फळांच्या रसाचे सेवन टाळा.

चहा आणि कॉफीचे सेवन टाळा

कॅफिनचे मधुमेही रुग्णांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि कॉफीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:56 IST
ताज्या बातम्या