Diabetes Control Tips: मधुमेहाची समस्या केवळ अनुवांशिक नसून खराब जीवनशैली, लठ्ठपणा, जास्त साखरेचे सेवन यामुळे देखील होऊ शकते. यामुळे मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. उच्च किंवा कमी रक्तातील साखरेची पातळी, हे दोन्ही खूप धोकादायक असू शकतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा

मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे, मग ते योगा, धावणे, चालणे असो. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे यकृत लवकर डिटॉक्स होते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

( हे ही वाचा: Ayurvedic Tips: पावसाळ्यात ‘हे’ आयुर्वेदिक उपाय अनेक आजारांपासून संरक्षण करतील; औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही)

रात्री उशीरा जेवण करू नका

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रात्री उशिरा जेवणाची सवय पूर्णपणे सोडून द्या. रात्रीच्या जेवणासाठी ७ ते ८ वाजेची वेळ योग्य आहे. रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान २ ते ३ तासांचे अंतर असावे कारण जेवणानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यासोबत जेवल्यानंतर थोडा वेळ फिरायला जा.

साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न आणि ग्लूटेनपासून दूर रहा

मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त नैसर्गिक साखरेचे सेवन करावे. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर, मैदा, ग्लूटेन आणि प्रक्रिया केलेले अन्न यापासून दूर राहा. साखरेच्या रुग्णांनी विशेषत: नाचणी, बाजरी, ज्वारी या धान्यांचा आहारात गव्हाऐवजी समावेश करावा. याशिवाय फायबरयुक्त पदार्थ देखील मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असतात.

( हे ही वाचा: मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा; नक्कीच आराम मिळेल)

औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी पूर्णपणे औषधांवर अवलंबून राहू नका. बरेच रुग्ण आपल्याला पाहिजे ते खातात आणि आपण औषधे घेत आहोत असा विचार करून जीवनशैलीत कोणताही बदल करत नाही पण हे योग्य नाही. औषधे घेण्यासोबतच आहार आणि जीवनशैलीत बदल करणेही खूप महत्त्वाचे आहे.