Diabetes Symptoms: डायबिटीज हा एक असा आजार आहे, जो हळूवार संपूर्ण शरीरात पसरतो आणि एक एक अवयव कायमचा निकामी करतो; ज्याची लक्षणं आपल्याला समजणारसुद्धा नाहीत इतक्या दबक्या पावलांनी येतात. एकदा हा आजार झाला की तो असाध्य होतो. नंतर तो कंट्रोल केला जाऊ शकतो, पण तो पूर्णपणे बरा करणे कठीण होते, त्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो.

मधुमेह झालाय हे कसं ओळखायचं?

डायबिटीज म्हणजे केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढणे नव्हे, तर त्याचा शरीराच्या विविध अवयवांवरही परिणाम होतो. वेळेवर निदान न झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि याचा सर्वाधिक फटका अनेकदा पायांना बसतो. शिवाय रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्याने रक्तभिसरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. मधुमेहावर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्याची सुरुवात कशी होईल याची जाणीव ठेवली पाहिजे. जेव्हा शरीरात इन्सुलिन कमी होते किंवा ते काम करणं बंद करते तेव्हा रक्तातील ग्लुकोज वाढतच जाते, त्यामुळे पायात अनेक लक्षणे दिसू लागतात; जे तुमच्या टाचांच्या माध्यमातून या आजाराबद्दल सांगू शकतात. यामुळे पायांमध्ये बधीरपणा, वेदना, जखमा आणि संसर्ग यांसारख्या समस्या उद्भवतात. मधुमेहाशी संबंधित पायांच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखली गेल्यास ही स्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते.

डायबिटीजमध्ये पायांच्या समस्या का उद्भवतात?

रक्तातील साखर सतत जास्त राहिल्याने शरीरातील नसांना नुकसान पोहोचते. याव्यतिरिक्त, ???पायांना होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे लहान जखमासुद्धा हळूहळू बऱ्या होतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.???

पायांना बधिरता किंवा मुंग्या येणे

पायांना वारंवार मुंग्या येणे किंवा स्पर्शज्ञान कमी होणे हे मज्जातंतूंच्या हानीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

जळजळ किंवा टोचल्यासारखी संवेदना

काही लोकांना जळजळ होणे, सुया टोचल्यासारखी वेदना होणे किंवा रात्रीच्या वेळी अस्वस्थता वाढणे यांसारखे त्रास जाणवतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु पहिली पायरी म्हणून मधुमेहाची (diabetes) तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

हळू बरी होणारी जखम

पायावर झालेली एखादी छोटीशी जखम, फोड किंवा दुखापत जर काही दिवसांत बरी झाली नाही तर त्याकडे दुर्लक्ष करू नये; कारण त्यामुळे संसर्ग (इन्फेक्शन) होऊ शकतो.

पायांवर सूज येणे

पायांवर विनाकारण सूज येणे ही चिंतेची बाब असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये असे घडू शकते; तसेच सततची सूज, लालसरपणा किंवा पायाला उबदारपणा जाणवणे ही लक्षणे संसर्ग किंवा रक्तप्रवाहातील समस्या दर्शवू शकतात.

पायांत वेदना

चालताना पोटऱ्यांमध्ये किंवा पायांत होणाऱ्या वेदना, ज्या विश्रांती घेतल्यावर कमी होतात, त्या रक्तप्रवाहातील समस्या दर्शवू शकतात.